शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
2
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
3
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
4
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
5
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
6
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
7
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
8
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
9
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
10
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
11
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
12
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
13
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
14
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
15
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
16
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
17
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
18
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?
19
Crime: गे डेटिंग अपवर ओळख, ८ जण फ्लॅटवर पार्टीसाठी भेटले; पार्टीनंतर शुभमचा मृत्यू
20
वर्ल्डकप विजेता कर्णधार MS Dhoni केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या भेटीला, Video केला शेअर

छ. संभाजीनगर परिसरातील विकासाचा मार्ग मोकळा; झालर क्षेत्र सिडकोकडून 'सीएसएमआरडीए'कडे वर्ग

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 12:54 IST

३३ वर्षांनंतर सिडकोकडून गेले वाळूज महानगर, प्राधिकरणाची होणार दमछाक

 

छत्रपती संभाजीनगर : शासनाने वाळूज एमआयडीसीलगत १९९१ साली अधिसूचनेद्वारे महानगर वसाहती निर्माण करण्याचा निर्णय घेतल्यानंतर विकसित केलेल्या सुमारे ८ हजार ६७ हेक्टर परिसरातून ३३ वर्षांनंतर सिडकोला नियोजन प्राधिकरण म्हणून बुधवारी शासनाच्या अधिसूचनेद्वारे बाहेर पडले. २००६ साली शहरातील १३ वसाहतींचे महापालिकेकडे १५ कोटींत हस्तांतरण करून सिडको बाहेर पडले होते. त्यानंतर झालर क्षेत्र आणि वाळूज महानगरातून सिडकोेची जबाबदारी संपुष्टात आली. सप्टेंबर २०२३ मध्ये सिडकोने सिडको वाळूज महानगर १, नगर २ व नगर ४ चे संपूर्ण क्षेत्र निरधिसूचित करण्याची (अधिसूचीतून काढण्याची) मागणी शासनाकडे केली होती.

वाळूज महानगर १, २, व ४ मध्ये प्रगतीपथावरील ११२.११ कोटींची व मंजूर असलेली १५३.१८ कोटींची कामे सिडकोला सर्व खर्चासह करावी लागतील. अधिसूचना राजपत्रात प्रसिद्ध झाल्यानंतर सिडकोचे कार्य झालर व वाळूज महानगरातून संपेल. सिडकोचे नियोजनाचे अधिकार प्राधिकरणाकडे गेले असले तरी सिडकोच्या ताब्यातील जमिनी, भूखंड विक्रीचे अधिकार सिडकोकडे असतील. सिडकोकडील नागरी सुविधांचे हस्तांतरण संबंधित स्थानिक संस्थांकडे करण्याची कार्यपद्धती ठरविण्यासाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन होईल. समितीत जिल्हाधिकारी, जि.प. सीईओ, सिडको मुख्य प्रशासक असतील.

प्राधिकरणावर भार२०१९ साली स्थापन झालेल्या छत्रपती संभाजीनगर महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणावर आता ३१३ गावांसह झालरची २६ गावे आणि वाळूज महानगर १, २ व ४ मधील सेवा-सुविधांसह नियोजनाचा भार असेल. या प्राधिकरणाकडे सध्या नियमित व कंत्राटी मिळून २५ कर्मचारी आहेत. दोन हजार ९७ चौरस मीटरचा परिसर ३१३ गावांच्या हद्दीत असून, आता झालरमधील २६ गावांतील १५ हजार हेक्टर व वाळूजमधील ८ हजार हेक्टर जमिनीच्या नियोजनाचा अतिरिक्त भार प्राधिकरणावर असेल. किमान २०० कर्मचाऱ्यांची गरज प्राधिकरणाला लागेल. हा डोलारा प्राधिकरणाला तीन महिन्यांत उभारावा लागेल.

प्राधिकरणाकडे असलेल्या गावांची जबाबदारीछत्रपती संभाजीनगर : १४३गंगापूर : ६७फुलंब्री : १९खुलताबाद : ४१पैठण : ४३झालर क्षेत्र : २६वाळूज महानगर : १, २, ४एकूण.... ३४२

सिडकोचा गाशा गुंडाळणे निश्चितशहरातील १३ वसाहती मनपाकडे गेल्या. वाळूजमधील सर्व महानगरे प्राधिकरणाकडे गेली. महत्त्वाकांक्षी असलेला झालर क्षेत्रांचा २६ गावांचा परिसरही सिडकोने भूसंपादन, इन्फ्रास्ट्रक्चरला लागणाऱ्या १० हजार कोटींहून अधिक अनुदान उभारणे शक्य नसल्यामुळे सोडला. आता सिडकोकडे शहरात रिक्त भूखंड विक्रीविना कुठलेही काम राहिलेले नाही. त्यामुळे जिल्ह्यातून सिडको गाशा गुंडाळण्याचे जवळपास निश्चित आहे.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरcidco aurangabadसिडको औरंगाबाद