शहरं
Join us  
Trending Stories
1
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
2
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
3
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
4
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
5
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
6
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
7
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
8
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
9
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
10
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
11
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
12
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
13
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
14
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
15
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
16
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
17
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
18
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
19
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
20
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान

चिअर्स! वर्षभरात मराठवाड्यातील मद्यपींनी रिचवली ५ हजार ७३३ कोटींची दारू

By राम शिनगारे | Updated: April 3, 2023 14:08 IST

छत्रपती संभाजीनगर विभागाच्या चार जिल्ह्यात उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी अवैध मद्य विक्री, बनावट दारूच्या विक्रीवर कारवाई केली.

छत्रपती संभाजीनगर : राज्य उत्नादन शुल्क विभागाने मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर विभागाला महसुलाचे ठरवून दिलेले उद्दिष्ट पूर्ण केले करीत बाजी मारली. या विभागाला २०२२- २३ आर्थिक वर्षात ५ हजार २५० कोटी रुपये महसुलाचे टार्गेट होते. हे टार्गेट पूर्ण करीत छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना आणि धाराशिव जिल्ह्यातून ५ हजार २५६ कोटी ६६ लाख रुपयांचा महसूल ३१ मार्चअखेर प्राप्त झाल्याची माहिती विभागीय उपायुक्त प्रदीप पवार यांनी दिली. नांदेड विभागाच्या चार जिल्ह्यांना ६१३ कोटी २८ लाख रुपये महसूलचे टार्गेट होते. त्या विभागाने ४७७ कोटी ५ लाख रुपये एवढाच महसूल प्राप्त केला आहे.

मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांसाठी एकच उपायुक्त हाेते, मात्र काही महिन्यांपूर्वी त्याचे विभाजन होऊन छत्रपती संभाजीनगर विभागात चार आणि नांदेड विभागात चार जिल्हे अशी विभागणी करण्यात आली. त्यातील पहिल्या विभागात छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना आणि धाराशिव जिल्ह्यांचा, तर दुसऱ्यात नांदेड, हिंगोली, परभणी आणि लातूर जिल्ह्यांचा समावेश आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आर्थिक वर्ष १ एप्रिल ते ३१ मार्च असे असते. २०२२-२३ या आर्थिक वर्षातील आकडेवारी १ एप्रिल रोजी समोर आली आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर विभागाने टार्गेट पूर्ण केले. नांदेड विभागाचे टार्गेट आणि प्राप्त महसूलात मोठी तफावत आहे. एकट्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ५ हजार १०० कोटी रुपयांची दारूची विक्री झाली. त्या खालोखाल नांदेड जिल्ह्यात ४५० कोटी, धाराशिवमध्ये १३७, लातूर जिल्ह्यात १७ कोटी ५० लाख, बीड जिल्ह्यात ११ कोटी ३१ लाख रुपयांची दारू विकली आहे.

टार्गेट पूर्ण करण्यात यशछत्रपती संभाजीनगर विभागाच्या चार जिल्ह्यात उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी अवैध मद्य विक्री, बनावट दारूच्या विक्रीवर कारवाई केली. तसेच अवैध ढाब्यावाल्यांच्या विरोधात उघडलेल्या माहिमेमुळे राज्य शासनाने ठरवून दिलेले महसूलचे टार्गेट पूर्ण करण्यात यश मिळाले. चालु आर्थिक वर्षातही हा विभाग महसूलात आघाडीवर राहणार आहे.- प्रदीप पवार, उपायुक्त, राज्य उत्पादन शुल्क विभाग, छत्रपती संभाजीनगर

राज्यात २१ हजार ५०० कोटींचा महसूलमराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमध्ये ५ हजार ७३३ कोटींची दारूच्या विक्रीतून महसूल राज्य शासनाला मिळाला आहे. त्याचवेळी राज्यात दारूची विक्री, परवान्याचे नूतनीकरण आदीतून २१ हजार ५०० कोटी रुपयांचा महसूल २०२२-२३ या आर्थिक वर्षात प्राप्त झाला आहे. २०२१-२२ या आर्थिक वर्षात १७ हजार ५०० कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला होता. त्या तुलनेत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या महसुलात नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात तब्बल २५ टक्के वाढ नोंदविल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. मागील वर्षीच्या तुलनेत तब्बल ४ हजार कोटी रूपये जास्त मिळाले आहेत.

छत्रपती संभाजीनगर विभाग (आकडे कोटीमध्ये)जिल्हा.....महसूलचे टार्गेट.....प्राप्त महसूलछत्रपती संभाजीनगर...५०९५....५१००धाराशिव.......१३५.......१३७.०५बीड........१०.......११.३१जालना.......१०.....८.३०

नांदेड विभाग (आकडे कोटीमध्ये)जिल्हा.....महसूलचे टार्गेट.....प्राप्त महसूलनांदेड....५८५........४४९.९०परभणी.....६.५७.....६.४०लातूर.....१८.६२......१७.५०हिंगोली....३.०९.......३.२५

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMarathwadaमराठवाडा