शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

रशिया-युक्रेनच्या धर्तीवर राज्यात स्वस्त वैद्यकीय शिक्षण;अमित देशमुखांनी दिली महत्वाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2022 16:39 IST

Amit Deshmukh: शुल्क रचनेच्या अभ्यासाबाबत राज्य सरकारच्या समितीचे काम सुरु असून लवकरच अहवाल प्राप्त होईल  

औरंगाबाद: युक्रेन आणि रशियामध्ये ( Russia Ukrain) वैद्यकीय शिक्षण शुल्क अत्यंत कमी असल्याने देशभरातून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी तेथे जातात. याच धर्तीवर राज्यातही स्वस्त वैद्यकीय शिक्षण देता येईल का ? यासाठी राज्य सरकारने एक अभ्यास समिती स्थापन केली आहे. ही समिती युक्रेन-रशियातील वैद्यकीय शिक्षण शुल्काचा अभ्यास करून, त्यासंबंधी लवकरच अहवाल देईल, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख (Amit Deshmukh) यांनी आज दिली. 

काँग्रेसचा डिजिटल सदस्य नोंदणी अभियान आणि मराठवाडा विभागीय मेळावा व आढावा बैठकीचे आज औरंगाबाद येथे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मंत्री अमित देशमुख यांनी मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी भारतातील भरमसाठ वैद्यकीय शिक्षण शुल्कावर भाष्य केले. रशिया आणि युक्रेनमधील स्वस्त वैद्यकीय शिक्षणावर बोलतांना मंत्री देशमुख यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. युक्रेन आणि रशियाच्या वैद्यकीय शुल्क रचनेचा अभ्यास करण्यासाठी अभ्यास समिती काम करीत आहे. त्या देशाप्रमाणेच राज्यात कमी शुल्क लावता येतील का ? याचा गांभीर्याने विचार सुरू आहे. समितीचा अहवाल आला की तो राज्यासमोर मांडला जाईल असेही मंत्री देशमुख यांनी सांगितले. 

भारताच्या तुलनेत २५ टक्के स्वस्त शिक्षणभारतापेक्षा कमी खर्चात वैद्यकीय शिक्षण देणारा देश म्हणून युक्रेन आणि रशियाची ओळख आहे. यामुळेच येथे वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांचे प्रमाण जास्त आहे. रशिया-युक्रेन युद्ध सुरु झाल्यानंतर हजारो भारतीय विद्यार्थी तिकडे अडकले आहेत. यामुळेच या देशांतील स्वस्त वैद्यकीय शिक्षणाबाबतही चर्चा सुरु झाली आहे. भारतात खासगी शिक्षणसंस्थेत एका विद्यार्थ्याच्या वैद्यकीय शिक्षणाच्या खर्चाच्या तुलनेत सुमारे २५ टक्के खर्चात तेथे वैद्यकीय पदवी मिळवता येते. 

टॅग्स :Amit Deshmukhअमित देशमुखdoctorडॉक्टरEducationशिक्षणAurangabadऔरंगाबादRussia Ukrainयुक्रेन आणि रशिया