शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
2
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
3
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
4
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
5
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
6
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
7
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
8
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
9
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
10
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
11
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
12
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
13
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
14
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
15
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
16
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
17
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
18
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
19
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
20
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?

प्रभारी प्राचार्या आणि पाठ्य निर्देशिकांत हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 23:25 IST

: पडेगाव येथील नर्सिंग ट्रेनिंग सेंटरमध्ये पाण्याच्या कारणावरून प्रभारी प्राचार्या आणि पाठ्य निर्देशिकांमध्ये हाणामारी झाल्याची घटना शुक्रवारी (दि.१२) दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत दोघींनीही एकमेकींवर मारहाणीचा आरोप केला.

ठळक मुद्देपाण्याचे कारण : पडेगाव येथील नर्सिंग ट्रेनिंग सेंटरमधील प्रकार

औरंगाबाद : पडेगाव येथील नर्सिंग ट्रेनिंग सेंटरमध्ये पाण्याच्या कारणावरून प्रभारी प्राचार्या आणि पाठ्य निर्देशिकांमध्ये हाणामारी झाल्याची घटना शुक्रवारी (दि.१२) दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत दोघींनीही एकमेकींवर मारहाणीचा आरोप केला.आरोग्य विभागांतर्गत पडेगाव येथे नर्सिंग ट्रेनिंग सेंटर आहे. याठिकाणी विद्यार्थिनींचे वसतिगृहदेखील आहे. गेल्या काही दिवसांपासून येथील विद्यार्थिनींना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. पाण्याचा टँकर येत नसल्याने पिण्याच्या पाण्यासह स्वच्छतागृहातही पाण्याचा तुटवडा आहे. विद्यार्थिनींना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असल्याने कर्मचाऱ्यांनी वापरासाठी घरून पाणी आणण्याचा मुद्दा प्रभारी प्राचार्या किरण जाधव यांनी मांडला होता. याच मुद्यावरून शुक्रवारी जाधव आणि पाठ्य निर्देशिका सुनीता रायपुरे यांच्यात मारामारीचा प्रकार घडला. यात दोघींच्याही चेहºयावर दुखापत झाली. या घटनेनंतर नर्सिंगच्या विद्यार्थिनी आणि किरण जाधव यांनी आरोग्य उपसंचालकांकडे धाव घेतली, तर सुनीता रायपुरे आणि परिचारिका संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी छावणी पोलीस ठाणे गाठले.फक्त मत मांडलेचार ते पाच दिवसांपासून टँकर येत नाही. त्यामुळे विद्यार्थिनींना पाणी कमी पडू नये, यासाठी कर्मचाºयांनी घरून बाटलीभर पाणी आणण्याचे फक्त मत मांडले होते. स्वच्छतागृहाचा वापर केलेला नसतानाही वाद घालत सुनीता रायपुरे यांनी मारहाण केली, असे प्रभारी प्राचार्या किरण जाधव यांनी सांगितले.घरून पाणी आणा म्हणेपाणी नसल्यामुळे विद्यार्थिनींनीच टँकर मागविले. त्यात किरण जाधव यांनी स्वच्छतागृहाचा वापर करण्यासाठी घरून पाणी आणण्यास सांगितले. त्या स्वत: मात्र, स्वच्छतागृहाचा वापर करतात. याची विचारणा के ल्यानंतर त्यांनी मारहाण केली, असे पाठ्य निर्देशिका सुनीता रायपुरे यांनी सांगितले.चौकशी समिती स्थापनआरोग्य उपसंचालक डॉ. स्वप्नील लाळे म्हणाले, या प्रकरणाची चौकशी क रण्यासाठी समिती स्थापन केली आहे. जिल्हा शल्यचिकित्सक आणि इतर अधिकारी नर्सिंग सेंटरला भेट देणार आहेत. संपूर्ण चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल.

टॅग्स :water shortageपाणीकपातCrime Newsगुन्हेगारी