शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
2
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
3
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
4
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
5
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
6
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
7
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
8
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
9
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
10
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
11
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
12
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
13
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
14
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
15
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
16
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
17
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
18
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
19
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
20
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी

बदलते राजकारण! 'ते सोबत असते तर खासदार असते'; खैरेंच्या दाव्याला संजय शिरसाटांची पुष्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 12:26 IST

लोकसभा, विधानसभा निवडणुका संपल्यानंतर शिंदेसेना खैरेंना ऑफर दिल्याबाबत पुष्टी करीत आहे.

छत्रपती संभाजीनगर : लोकसभा निवडणुकीदरम्यान उद्धवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांना मीच शिंदेसेनेत येण्याची ऑफर दिली हाेती. ते सोबत आले असते तर आज खासदार राहिले असते, असा दावा करीत शिंदेसेनेचे प्रवक्ते पालकमंत्री संजय शिरसाट यांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली. खैरेंनी ऑफर नाकारली. त्यामुळे त्यांच्यावर आता माजी खासदार म्हणून फिरण्याची वेळ आलीय, अशी कोपरखळीही त्यांनी लगावली.

लोकसभा, विधानसभा निवडणुका संपल्यानंतर शिंदेसेना खैरेंना ऑफर दिल्याबाबत पुष्टी करीत आहे. खैरेदेखील ऑफर मिळाली होती, हे सहा महिन्यांनी सांगत आहेत. त्यामुळे यामागे काही तरी राजकारण शिजत असल्याची चर्चा आहे.

उद्धवसेनेला गळती लागली आहे, त्यामुळे खैरेंना आता पुन्हा ऑफर मिळणे अवघड आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमुळे उद्धवसेनेतील अनेक जण शिंदेसेनेत जात आहेत. खैरे यांना खरेच शिंदेसेनेने ऑफर दिली होती की, ते स्वत:चे महत्त्व वाढविण्यासाठी दावा करीत आहेत. यावरून राजकीय वर्तुळ ढवळून निघाले. परंतु शिरसाट यांनी आपणच ‘ऑफर’ दिल्याचे सांगून खैरेंच्या दाव्याला बळ दिले. शिंदेसेनेकडून खासदारकी आणि राज्यपालपदाची ऑफर भाजपने दिल्याचा दावा खैरेंनी केल्यानंतर सोशल मीडियातून त्यांच्या दाव्यावर जोरदार टीका करणाऱ्या प्रतिक्रिया उमटल्या.

काय म्हणाले होते खैरे?लोकसभा निवडणुकीच्या काळात शिंदेसेनेकडून उमेदवारीची व भाजपकडून पक्षप्रवेशासह राज्यपालपदाची ऑफर मिळाली होती, असा दावा चंद्रकांत खैरे यांनी केला होता. परंतु मी निष्ठावंत शिवसैनिक आहे, त्यामुळे दोन्ही पक्षांच्या ऑफरला नाकारले. उद्धवसेनेतून मी बाहेर पडणार नाही, असेही त्यांनी ठामपणे सांगितले होते. यावर शिरसाट यांनी खैरेंच्या दाव्यावर स्पष्टीकरण दिले.

शिंदेसेनेतील गटबाजीमुळे प्रवेश थांबलाउद्धवसेनेला विधानसभा निवडणुकीनंतर गळती लागली आहे. उद्धवसेनेतील शिंदेसेनेच्या वाटेवर अनेक जण आहेत. गेल्या आठवड्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत येथील काही जणांची जालन्यात प्रवेशाची तयारी झाली. परंतु पालकमंत्री आणि आमदारांना याबाबत काहीही माहिती नव्हती. त्यामुळे उद्धवसेनेच्या चार नगरसेवकांचा प्रवेश लांबणीवर पडला. प्रवेशावरून शिंदेसेनेतही गटबाजी सुरू झाल्याची चर्चा आहे. छत्रपती संभाजीनगरचा प्रवेश जालन्यात कशासाठी, असा प्रश्न उद्धवसेनेतील त्या माजी नगरसेवकांनी शिंदेसेनेच्या एका पदाधिकाऱ्याकडे उपस्थित केल्याची चर्चा आहे.

टॅग्स :Chandrakant Khaireचंद्रकांत खैरेSanjay Shirsatसंजय शिरसाटlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Shiv Senaशिवसेना