शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
2
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
3
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
4
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
5
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
6
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
7
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
8
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
9
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
10
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
11
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
12
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
13
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
14
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
15
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
16
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
17
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
18
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
19
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
20
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती

जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांचे रुपडे पालटणाऱ़़़!

By admin | Published: July 31, 2014 12:15 AM

संजय तिपाले, बीड कधी आरोग्य केंद्र बंद... कधी वैद्यकीय अधिकाऱ्यांची अनुपस्थिती तर कधी औषध व उपचार साहित्यांचा अभाव... हे प्राथमिक आरोग्य केंद्रांतील निराशाजनक चित्र आता बदलणार आहे.

संजय तिपाले, बीडकधी आरोग्य केंद्र बंद... कधी वैद्यकीय अधिकाऱ्यांची अनुपस्थिती तर कधी औषध व उपचार साहित्यांचा अभाव... हे प्राथमिक आरोग्य केंद्रांतील निराशाजनक चित्र आता बदलणार आहे. कारण आरोग्य विभागाने प्राथमिक आरोग्य केंद्रांचा ‘कायापालट’ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी एक कोटींचा प्रस्तावही तयार करण्यात आला आहे.आरोग्य विभागाच्या प्रधान सचिव सुजाता सोहनिक यांच्या संकल्पनेतून कायापालट योजना पुढे आली आहे. पुणे जिल्ह्यात ही योजना यशस्वी ठरली आहे. प्रत्येक तालुक्यातून एक याप्रमाणे ११ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ही योजना राबविली जाईल. यातून ग्रामीण आरोग्य सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी पायाभूत सोयी व अद्ययावत साधने उपलब्ध करुन दिली जाणार आहेत. सुशोभिकरण, लेक वाचवा मोहीम, कुपोषण निर्मूलन, माता- बाल आरोग्य असे विविध उपक्रम राबविण्यात येतील. शिवाय वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देखील दिले जाणार आहे. जिल्हा प्रजनन व बालस्वास्थ्य अधिकारी डॉ. एच. व्ही. वडगावे यांनी कायापालटसाठी मूलभूत सुविधांचा अभाव असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांचा प्रारुप आराखडा तयार केला आहे. तो मंजुरीसाठी लवकरच सीईओ राजीव जवळेकर यांच्यापुढे ठेवला जाईल, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गोवर्धन डोईफोडे यांनी दिली.या सुविधांचा समावेश...कायापालटअंतर्गत प्राथमिक आरोग्य कें द्रांतील मूलभूत सुविधांचा दर्जा उंचावण्यात येणार आहे. शस्त्रक्रियागृहात टाईल्स लावण्यात येतील, सूचनाफलक, औषधी तक्रार पेटी, विविध योजनांची माहिती दर्शवणारे फलक बसविले जातील. सर्व अधिकारी कर्मचारी ओळखपत्र वापरतील. वैद्यकीय अधिकाऱ्यांना अ‍ॅप्रनचा सक्तीने वापरावे लागेल. प्राथमिक आरोग्य केंद्राचे सुशोभिकरण केले जाणार आहे. रुग्णांना बसण्यासाठी पुरेशी आसनव्यवस्था, अद्यावत प्रसूतीगृह आदी सुविधा देण्यात येतील. याशिवाय टाकाऊ वस्तूंची विल्हेवाट करण्यासाठीही सोय केली जाईल. आरोग्य सुविधा उंचावतीलसीईओ राजीव जवळेकर म्हणाले, ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा अद्ययावत करण्यासाठी ही योजना प्रभावी ठरेल. त्यासाठी एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला जाणार आहे. सुविधांमध्ये सुधारणा करून ग्रामीण रुग्णांना अत्याधुनिक सोयी देण्याचा प्रयत्न आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये योजना सक्सेस झाली तर उपकेंद्रांमधूनही राबविता येईल, असेही त्यांनी सांगितले....तरच होेईल अंमलबजावणी जिल्ह्यात २९० उपकेंद्रे, ५० प्राथमिक आरोग्य केंद्रे, १ जिल्हा रुग्णालय, ४ ग्रामीण रुग्णालये, १ महिला रुग्णालय, ३ उपजिल्हा रुग्णालये आहेत. वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे, दांडीबहाद्दर अधिकारी- कर्मचारी यामुळे आरोग्य सुविधांची वाताहत आहे. अशा स्थितीत या योजनेची अंमलबजावणी महत्त्वाची आहे.अत्याधुनिक सुविधा येतील; पण वैद्यकीय अधिकारीच मुख्यालयी थांंबले नाही तर या सुविधांचा रुग्णांना कितपत फायदा होईल ही शंकाच आहे.या ‘पीएचसीं’ची निवड...कायापालटसाठी प्रत्येक तालुक्यातील एका प्राथमिक आरोग्य केंद्राची निवड केली आहे. प्रत्येक आरोग्य केंद्रावर साधारणत: दहा लाख रुपये खर्च केले जातील. तालुकानिहाय प्राथमिक केंद्रे अशी: बीड- चौसाळा, पाटोदा- नायगाव, केज- विडा, अंबाजोगाई- घाटनांदूर, परळी- सिरसाळा, गेवराई- तलवाडा, शिरूर- शिरूर, धारूर- भोगलगाव, आष्टी- कडा, वडवणी- कुप्पा, माजलगाव- टाकरवण.