शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

१४ जानेवारीस विद्यापीठ नामविस्तार दिनानिमित्त औरंगाबाद शहरातील वाहतुकीत बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 18:14 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या २४ व्या नामविस्तार दिनी १४ जानेवारीला विविध पक्ष आणि संघटनांतर्फे अभिवादन रॅली काढल्या जाते. तसेच विद्यापीठ प्रवेशद्वारासमोर जाहीर सभा होतात. त्यामुळे होणारी गर्दी लक्षात घेता पोलिसांनी वाहतुकीत काही बदल केले आहेत.

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या २४ व्या नामविस्तार दिनी १४ जानेवारीला विविध पक्ष आणि संघटनांतर्फे अभिवादन रॅली काढल्या जाते. तसेच विद्यापीठ प्रवेशद्वारासमोर जाहीर सभा होतात. त्यामुळे होणारी गर्दी लक्षात घेता पोलिसांनी वाहतुकीत काही बदल केले आहेत. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरात नागरिकांची व वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ राहणार असल्याने जनतेस अडथळा, गैरसोय होऊ नये यासाठी दि. १४ जानेवारी रोजी सकाळी ६ वाजेपासून ते रात्री ११ वाजेपर्यंत पुढीलप्रमाणे मार्ग सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद राहील. १) मिलिंद महाविद्यालय चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा प्रवेशद्वार हा रस्ता सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद राहील. २) ज्युबली पार्क ते विधि महाविद्यालय चौक हा रस्ता नामविस्तार दिनासाठी येणारी वाहने सोडून इतर वाहनांकरिता बंद राहील. ३) मकाई गेट ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्रवेशद्वार हा रस्ता सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद करण्यात येत आहे. 

या कालावधीत पुढीलप्रमाणे पर्यायी मार्गाचा वापर करण्यात यावा. १) मिलिंद चौकातून बेगमपुराकडे जाणारी सर्व वाहने मिलकॉर्नर, ज्युबली पार्क, मलिक अंबर चौकमार्गे जातील. २) बेगमपुर्‍याकडून मिलिंद चौकाकडे जाणारी वाहने मलिक अंबर चौक, ज्युबली पार्क, मिलकॉर्नर मार्गे मिलिंद चौकाकडे जातील. ३) या कार्यक्रमासाठी येणारी सर्व वाहने मिलिंद महाविद्यालयाचे मैदान व पी.ई.एस. अभियांत्रिकीच्या प्रांगणात उभे केले जातील. तसेच ही अधिसूचना बंदोबस्तावरील पोलीस अधिकारी, कर्मचारी, अग्निशामक दल, रुग्णवाहिका, आरोग्य सेवा, दंडाधिकारी, अत्यावश्यक सेवा यांच्या वाहनांना लागू राहणार नाही, असे सहा. पोलीस आयुक्त रामेश्वर थोरात यांनी कळविले आहे.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादAurangabadऔरंगाबादTrafficवाहतूक कोंडीtraffic policeवाहतूक पोलीस