शहरं
Join us  
Trending Stories
1
"पेट्रोल-डिझेल वाचवा... 'वर्क फ्रॉम होम' पुन्हा सुरू करा!"; असं का म्हणताहेत पंतप्रधान मोदी? देशवासीयांना केलं मोठं आवाहन
2
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
3
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
4
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
5
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
6
Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल
7
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
8
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
9
"बाबा, ही खेळी तुमच्यासाठी..." १३ चेंडूतील विक्रमी फिफ्टीनंतर उर्विल पटेलचं भावूक सेलिब्रेशन
10
पाकिस्तान हादरलं! आत्मघातकी कार बॉम्बस्फोटात १६ जवानांचा मृत्यू; १०० हून अधिक दहशतवाद्यांचा भीषण हल्ला
11
ऑपरेशन सिंदूरचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तानची नवी चाल; बहावलपूरमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा पुन्हा उभा!
12
धक्कादायक! अनैतिक संबंधात अडसर, पतीला शॉक देऊन संपवण्याचा प्रयत्न; पत्नीसह प्रियकराला अटक
13
Urvil Patel Fastest Fifty Record : उर्विल पटेलचं वादळी अर्धशतक; यशस्वी जैस्वालच्या विक्रमाची बरोबरी
14
धक्कादायक! मोदींच्या नियोजित सभेच्या ठिकाणापासून जवळच सापडली स्फोटके, बंगळुरूत खळबळ
15
तमिळनाडूत थलपती सरकारचा पॉवरफुल निर्णय! मोफत विजेची मर्यादा थेट 'दुप्पट', सर्वसामान्यांचे बिल निम्म्यावर
16
IPL 2026 : १८० पेक्षा अधिक धावसंख्येचा पाठलाग करताना कसा आहे CSK चा रेकॉर्ड?
17
Thalapathy Vijay : Video - 'डाऊन टू अर्थ' मुख्यमंत्री! शपथ होताच उचललं टेबल; विजय यांच्या साधेपणाने जिंकली लोकांची मनं
18
लग्नाचा हट्ट नडला! प्रियकराने भावोजीच्या मदतीने प्रेयसीचा काटा काढला; रेल्वे ट्रॅक शेजारी फेकला मृतदेह
19
CSK vs LSG : हाऊ इज द जोश! Josh Inglis चा धमाका! शतक हुकलं; पण वादळी खेळीसह साधला मोठा डाव
20
Video - अतूट बंध! तू एकटी नाहीस... कॅन्सरशी लढणाऱ्या पत्नीसाठी पतीनेही कापले स्वत:चे केस
Daily Top 2Weekly Top 5

३ री, ४ थीच्या अभ्यासक्रमात बदल

By admin | Updated: June 12, 2014 00:27 IST

नवीन अभ्यासक्रम : घोकमपट्टीऐवजी अनुभवातून शिक्षणावर जोर

कळमनुरी : यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून ३ री व ४ थीच्या अभ्यासक्रमात बदल करण्यात आलेला आहे. त्यात घोकपट्टीऐवजी विद्यार्थ्यांना अनुभवातून शिक्षण मिळावे, यावर भर देण्यात आला आहे.
जीवनातील आव्हाने विचारात घेवून यंदाचा अभ्यासक्रम तयार करण्यात आलेला आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना आवश्यक त्या सुविधा, वातावरण व संधी उपलब्ध करून देण्याचा त्यात प्रयत्न केलेला आहे. तसेच ज्ञान संरचनावादी विचारसरणी रूजविणे, विद्यार्थ्यांचे पूर्वज्ञान, बोलीभाषा त्यांचे अनुभव या बाबींना अभ्यासक्रमात स्थान देण्यात आले आहे. भाषाविषयक नवा दृष्टीकोण, भाषिक समता क्षेत्रे, अध्ययन क्षेत्रे, घर आणि परिसरातील संधी, वर्गशाळा, व शाळाबाहेरील समाज या शिक्षण विषयक मार्गदर्शन तत्वांचा समावेश या अभ्यासक्रमात करण्यात आलेला आहे. नवीन अभ्यासक्रम बदलाबाबत कळमनुरी तालुक्यातील ३ रीला शिकविणाऱ्या शिक्षकांना ९ ते १३ जून दरम्यान प्रशिक्षण देण्यात आहे. त्यात १२ साधनव्यक्ती शिक्षकांना प्रशिक्षण देत आहेत. या प्रशिक्षणाचे उद्घाटन विस्तार अधिकारी बी.एस. सोनुने यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गटसमन्वयक बालाजी गोरे, केंद्र प्रमुख बोबडे, डवरे, पत्रे, आमले, शेख, कोल्हे, दराडे, मगर, अंभोरे, इंगले, रापतवार, मनवर, नाईक आदी उपस्थित होते. (वार्ताहर)
असा करण्यात आला अभ्यासक्रमात बदल
वर्ग ३ री व ४ थीसाठी परिसर अभ्यास हा भाग दोन टप्प्यांत विभागला आहे. पहिल्या टप्प्यात विज्ञान, भूगोल आणि नागरिकशास्त्र या विषयांचा समावेश आहे. दुसऱ्या टप्प्यात इतिहास विषयाचा समावेश करण्यात आलेला आहे. यापूर्वी या वर्गास ९ विषय होते. आता ७ विषय अभ्यासक्रमात ठेवण्यात आलेले आहेत. दोन विषयांचा सारांश कमी करण्यात आलेला आहे. आता विद्यार्थ्यांची विचार प्रक्रिया ही त्यांच्याच अनुभवविश्वचा आधारे अखंड ठेवून अध्ययन करण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांना दिले जाणारे अनुभव हे पाठ्या पुस्तकारपुरते मर्यादित न राहता आवश्यक ते अनुभव शिक्षकांनी देण्याची योजना आहे. त्यानुसारच आभ्यासक्रम तयार करण्यात आलेला आहे.
- डी. व्ही. तोंडे, राज्यस्तरीय साधनव्यक्ती, कळमनुरी.