शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
2
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
3
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
4
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
5
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
6
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
7
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
8
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
9
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
10
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
11
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
12
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
13
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
14
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
15
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
16
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
17
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
18
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
19
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
20
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."

चैतन्य अपहरण : मोबाइल, सीमकार्ड, पिस्तूल पुरवणारे दोघे उत्तर प्रदेश, बिहारमधून अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 14:50 IST

नेपाळ सीमेवर गुन्हे शाखेच्या पथकाची पाच दिवस रेकी

छत्रपती संभाजीनगर : एन-४ मधून चैतन्य तुपे या चिमुकल्याच्या अपहरण प्रकरणात गुन्हे शाखेने रामप्रवेश रघुनाथ मद्देशिया (रा. पिपरा जटामपूर, कुशीनगर, उत्तर प्रदेश) व राजीव ऊर्फ ढोना रंजन कुमार (वय २७, रा. जगदीशपूर, भोजपूर) यांना अटक करून सोमवारी शहरात आणले. पाच दिवसांपासून गुन्हे शाखेची दोन पथके दोन्ही राज्यांत रेकी करून दबा धरून बसली होती.

४ फेब्रुवारी रोजी रात्री एन-४ मधून चैतन्यच्या अपहरणाने शहर हादरले होते. अपहरणकर्त्यांच्या गाडीचा अपघात झाला आणि चैतन्यला पळवून नेण्याचा कट फसला. यामुळे अवघ्या १६ तासांच्या आत अपहरणकर्ते पोलिसांच्या हाती लागले व चैतन्यची सुखरूप सुटका झाली. यात अपहरणाचा मुख्य सूत्रधार हर्षल शेवत्रे याला सीमकार्ड, माेबाइलसाठी रामप्रवेशने मदत केली होती, तर राजीवने साजन ऊर्फ विवेक विभूती याच्या माध्यमातून पिस्तूल पुरवले हाेते. गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक विशाल बाेडखे उत्तर प्रदेशमध्ये, तर विशाल सोळुंके बिहारमध्ये पाच दिवसांपासून दोघांच्या शोधात हाेते.

सीम, मोबाइलची मदत, चार लाखांची कबुलीपुण्याला सोबत मजुरीचे काम करताना हर्षलने रामप्रवेशला अपहरणाचा विचार सांगितला होता. त्यासाठी रामप्रवेशने त्याला उत्तर प्रदेशचे सीम व एक जुना मोबाइल पुरवला. यासाठी हर्षलने अपहरणानंतर दोन कोटी पैकी चार लाख रुपये देण्याचे आमिष दाखवले होते. मात्र, अपहरणाचा कट फसल्याची कुणकुण रामप्रवेशला कळताच तो पुण्यातून पळून गावाला गेला होता.

दिवसा बिहारमध्ये, मध्यरात्री घरीरामप्रवेशचे गाव उत्तर प्रदेश-नेपाळ सीमेवर आहे. तेथून बिहारदेखील जवळ आहे. आपल्या अटकेसाठी पोलिस कधीही येतील, या भीतीने रामप्रवेश दिवसभर बिहारमध्ये रोजंदारीवर जाऊन मध्यरात्री घरी परत यायचा. उपनिरीक्षक विशाल बोडखे यांच्या पथकाने चार दिवस पाळत ठेवून त्याला शनिवारी अटक केली, तर राजीवला त्याच्या गावातूनच ताब्यात घेतले.

दहा आरोपींना अटकहर्षल शेवत्रे (वय २१), जीवन शेवत्रे (२६), प्रणव शेवत्रे (१९), कृष्णा पठाडे (२०) हर्षल चव्हाण (२०, चौघेही रा. ब्रह्मपुरी), शिवराज गायकवाड (२०), विवेक ऊर्फ साजन भूषण (२४, रा. बिहार), संकेत शेवत्रे (१९).

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरCrime Newsगुन्हेगारीKidnappingअपहरण