शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

अपहरणापासून सोळा तास अश्रू रोखले; पोलिस आयुक्तांच्या दालनात बाप-लेक धाय मोकलून रडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2025 13:07 IST

आधी जे अपहरणकर्त्यांचे साथीदार वाटले; पोलिस असल्याचे समजताच आयुक्तालयात चैतन्यने त्यांचे पाय धरले

छत्रपती संभाजीनगर : अपहरणासोबतच चैतन्यने एक भीषण अपघात पाहिला. अपहरणकर्त्यांचा छळ सहन केला. तरीही चैतन्य डगमगला नाही. शेतात पोलिस पोहोचले तेव्हाही चैतन्य घाबरलेला, पण स्तब्ध होता. पोलिस आयुक्तालयात आणेपर्यंत शांत होता. पोलिस आयुक्तांच्या दालनाचे दार उघडले आणि सोळा तासांपासून दाबून ठेवलेल्या बाप लेकांच्या अश्रूंचा बांध फुटला. कडकडून मिठी मारत दोघेेही धाय मोकलून रडले तेव्हा उपस्थित अधिकारीही गहिवरले.

अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुटल्यानंतर चैतन्य पोलिसांच्या पथकासह बुधवारी सायंकाळी ६:१५ वाजता पोलिस आयुक्तालयात पोहोचला. १६ तासांपासून भीती अन् अश्रू त्याने रोखून धरले होते. त्यामुळे ‘सुपरमॅन चैतन्य’ असे कौतुकोद्गार पोलिसांच्या तोंडून निघाले. पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी त्याची चौकशी केली. त्याच्या कुटुंबाने पोलिसांचे आभार मानत सत्कार केला.

जे अपहरणकर्ते वाटले, त्यांचे पाय धरलेअपहरणकर्त्यांकडे शस्त्राची शक्यता होती. त्यामुळे शेतात शिरताना उपनिरीक्षक विशाल बोडखे, संदीप सोळुंके शस्त्रासह साध्या वेशात होते. चैतन्यपर्यंत ते पोहोचले, तेव्हा काही वेळ तेही हर्षलचेच साथीदार असल्याचे चैतन्यला वाटले. त्यामुळे तो स्तब्धच होता. विशाल यांनी आपली ओळख देत त्याच्या आजोबांना व्हिडिओ कॉल केला. त्यानंतर चैतन्यने त्यांच्यावर विश्वास ठेवला. शहरात परतताना निरीक्षक गीता बागवडे यांच्या मांडीवर डोके ठेवून तो झोपी गेला. पोलिस आयुक्तालयातून घरी जाताना चैतन्य सर्व अधिकाऱ्यांच्या पाया पडला. तेव्हा अपहरणकर्ते समजलेल्या विशाल यांच्या पाया पडताना 'थँक यू सर' असे म्हणत आभार मानले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरKidnappingअपहरण