शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पैठण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अन उपसभापती दोन्ही पदे बिनविरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2023 16:12 IST

भापती व उपसभापती पदासाठी निर्धारित वेळेत राजूनाना भुमरे व राम पा. ऐरंडे यांचेच अर्ज दाखल झाल्याने निवडणूक बिनविरोध पार पडली.

पैठण: पैठण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी राजूनाना भुमरे यांची तर उपसभापतीपदी जेष्ठ संचालक राम पा एरंडे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या नेतृत्वाखाली कृषी उत्पन्न बाजार समितीचा सर्व पँनल बहुमताने विजयी झाला होता. सभापती उपसभापतीची निवड झाल्यानंतर समर्थकांनी फटाके वाजवून जल्लोष साजरा केला. 

आज सकाळी सभापती व उपसभापती यांची निवड करण्यासाठी सकाळी अकरा वाजता निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निबंधक अनिल पुरी, बाजार समितीचे सचिव नितीन विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रक्रिया सुरू करण्यात आली. सभापती व उपसभापती पदासाठी निर्धारित वेळेत राजूनाना भुमरे व राम पा. ऐरंडे यांचेच अर्ज दाखल झाल्याने निवडणूक बिनविरोध पार पडली. राजूनाना भुमरे यांची दुसऱ्यांदा सभापती म्हणून निवड झाली असून उपसभापती पदी वर्णी लागलेले राम एरंडे गेल्या २५ वर्षापासून बाजार समितीचे संचालक आहेत. यामुळे बाजारसमितीचा कारभार अनुभवी हातात गेल्याचे मानले जात आहे.

पैठण बाजार समितीच्या निवडणुकीत रोहयो तथा फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांच्या नेतृत्वाखाली सर्व अठरा संचालक बहुमताने विजयी झाले होते. महाविकास आघाडीला या निवडणुकीत खातेही उघडता आले नव्हते. मंत्री भुमरे कुणाला संधी देणार याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. मात्र, आज अपेक्षेप्रमाणे राजूनाना भुमरे व राम ऐरंडे यांची सभापती उपसभापती पदी निवड झाली. 

आज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात संचालक, बोंबले बद्रीनाथ, मुळे सुभाष, दोरखे विठ्ठल, तांबे राजेंद्र, मोगल सचिन, कारके भगवान, नरके शरद, तवार संभाजी, जाधव शिवाजी, व्होरकटे साईनाथ, खराद मनीषा नामदेव, शशिकलाबाई परसराम हजारे, घनवट गंगासागर , काला महावीर, मुंदडा महेश, टेकाळे राजू यांच्या सह महानंदचे राज्य संचालक नंदलाल काळे, शिवाजी बँकेचे अध्यक्ष रवींद्र काळे, शेखर शिंदे, भूषण कावसानकर, शहादेव लोहारे, सुनील हिंगे, रवींद्र सिसोदे, अमोल एरंडे, नितीन एरंडे, नामदेव खराद, अमोल जाधव, दिनेश खंडागळे आदींसह मोठ्या संख्येने समर्थक उपस्थित होते.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMarket Yardमार्केट यार्डSandipan Bhumreसंदीपान भुमरे