शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद शहरात होळीची शतकोत्तर परंपरा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2019 19:43 IST

शहरातील राजाबाजार येथील संस्थान गणपती मंदिर चौकाची मानाची होळी असते.

औरंगाबाद : वर्षभर ज्या सणाची आतुरतेने वाट पाहिली जाते तो होळीचा सण आज बुधवारी (२० मार्च) सर्वत्र साजरा करण्यात येत आहे. ऐतिहासिक शहरातील होळीला शतकोत्तर परंपरा आहे. यात शहरातील राजाबाजार येथील संस्थान गणपती मंदिर चौकाची मानाची होळी असते. याशिवाय जाधवमंडी, सुपारी हनुमान मंदिर रोड, तसेच हर्सूल येथील होळी उत्सव सर्वात जुना मानला जाते. 

राजाबाजारातील मानाची होळीशहराचे ग्रामदैवत राजाबाजार येथील संस्थान गणपती मंदिर चौकातील होळी ही मानाची म्हणून ओळखली जाते. संस्थान गणपती ट्रस्टचे विश्वस्त प्रफुल्ल मालाणी यांनी सांगितले की, येथील होळीला सुमारे १५० वर्षांपेक्षा अधिक काळाची परंपरा आहे. आता संस्थान गणपती ट्रस्ट सोबत राजाबाजार मित्रमंडळाच्या संयुक्त विद्यमाने होळी सण साजरा केला जातो. एरंड्याचे झाड आणून चोहीबाजूने लाकड, गोवºया रचली जाते. परिसरातील महिला या होळीच्या चोहोबाजूने सुरेख रांगोळी काढतात. यंदा सायंकाळी ७.३० वाजता होळी दहनाच्या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. मानाची होळी असल्याने दरवर्षी येथे विविध राजकीय पक्षाचे नेते, पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी आरतीसाठी येत असतात. पूजा करून होळीचे दहन केले जाते. यानंतर खºयाअर्थाने रंग खेळण्यास सुरुवात होते.

जाधवमंडीत नैसर्गिक रंगाचा वापर जाधवमंडी येथील जबरे हनुमान मंदिर परिसरात होळी साजरी केली जाते. पिढ्यान्पिढ्यापासूनची येथे होळी साजरी करण्याची परंपरा आहे. पहिलवान मंडळींचा गढ म्हणून हा भाग ओळखला जातो. येथे होळीच्या नंतर जो रंग उडविला जातो तो नैसर्गिक रंग असतो. लेंगी गाणे म्हणत बंजारा समाजातर्फे होळीची पूजाबंजारा समाजात होळी उत्सवाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. काळ बदलला; पण बंजारा समाजाने आपली संस्कृती, परंपरा कायम ठेवली, याची प्रचीती या सणाच्या निमित्ताने येते. शहरातील बंजारा कॉलनी, जवाहर कॉलनी, सातारा तांडा आदी परिसरात बंजारा समाजातील पुरुष व महिला एकत्र येऊन होळीची पूजा करतात. डफ वाजवत होळीभोवती सात प्रदक्षिणा घातल्या जातात. यानंतर होळी पेटविल्यानंतर लेंगी गाणी म्हटली जातात. हर्सूलमधील होळी उत्सव शहराच्या उत्तर बाजूस असलेल्या हर्सूल गावातील होळीसुद्धा शतकोत्तर काळापासून सुरू आहे. सर्व गावकरी एकत्र येऊन येथे होळी साजरी करतात. विठ्ठल-रुख्मिणी मंदिर परिसरात उत्सवाला सुरुवात होते. या होळीचे वैशिष्ट्ये म्हणजे जपलेल्या गावकºयांपैकी ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते होळी पेटविली जाते. 

टॅग्स :Holiहोळी 2023Aurangabadऔरंगाबादpaithan gateपैठण गेट