शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारनंतर आता संपूर्ण देशात मतदार याद्यांची तपासणी होणार; SIR बाबत आदेश निघाले...
2
मुस्लीम धर्मगुरुंसोबत RSS प्रमुख मोहन भागवतांनी केली चर्चा; ३ तासांच्या बैठकीत काय ठरले?
3
महापालिका निवडणुकीसाठी महायुतीचा करेक्ट कार्यक्रम; लाडकी बहीण योजनेतील पडताळणीला स्थगिती?
4
मनसेशी युती करण्याचा शिंदेसेनेचा आग्रह; राज ठाकरेंच्या टाळीसाठी एवढा आटापिटा कशासाठी? चर्चांना उधाण
5
मोठी दुर्घटना! राजस्थानमध्ये शाळेचे छत कोसळले, ४ विद्यार्थ्यांचा मृत्यू, मदतकार्य सुरू
6
दोन्ही सभागृहांतील विरोधी पक्षनेतेपद राहणार ४ महिने रिक्त;  विधानसभेतील पदाचा निर्णयही प्रलंबित
7
झारखंडमधील ACB पथकाने अटक केलेला अमित साळुंखे कोण?; संजय राऊतांचा शिंदे पिता-पुत्रावर खळबळजनक आरोप
8
घटनेच्या उद्देशिकेतून समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष शब्द हटवणार का?; केंद्र सरकारने संसदेत दिले उत्तर
9
इलेक्ट्रिक टुव्हीलरनंतर आता थ्री-व्हीलर! 'या' कंपनीने बाजारात उतरवले रिक्षाचे २ मॉडेल्स; किंमत आणि फीचर्स काय?
10
श्रावण शुक्रवार: नैवेद्याला करा 'कोकोनट मलई खीर'; तांदळाच्या खिरीला खोबऱ्याचा ट्विस्ट!
11
अमेरिकेतील मराठी शाळांना महाराष्ट्र सरकारतर्फे अभ्यासक्रम पुरवणार; आशिष शेलारांचे आश्वासन
12
थायलंड-कंबोडिया संघर्ष दुसऱ्या दिवशीही सुरूच; आतापर्यंत १५ जणांचा मृत्यू; UN'ने बोलावली आपत्कालीन बैठक
13
NSDL IPO: बहुप्रतीक्षित एनएसडीएल आयपीओचा प्राईज बँड निश्चित; GMP किती, कधीपासून गुंतवणूक करू शकता? जाणून घ्या
14
पहिला श्रावणी शनिवार: अश्वत्थ मारुती व्रताचरण; कसे करावे पूजन? पाहा, व्रतकथा अन् महात्म्य
15
आता नाशिकची वाईन अन् केरळची ताडी थेट ब्रिटनमध्ये मिळणार! यूकेमध्ये विक्रीचा मार्ग मोकळा
16
१८ वर्षाखाली सहमतीने शारीरिक संबंध ठेवू शकतो का?; केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टात दिलं उत्तर
17
ना स्टॅाक ना SIP.., रिटर्नसाठी PPF सर्वांचा बॅास; केवळ १ लाखातून बनेल १ कोटींचा फंड
18
ओलाचा बैल केला, शेतीला जुंपला! ईलेक्ट्रीक स्कूटरने ३० एकर शेत नांगरले; शेतकरी म्हणाले...
19
OYO कांड! विवाहित प्रेयसीसोबत पकडले, प्रियकराने विवस्त्रावस्थेतच हायवेवरून धूम ठोकली... 
20
लिव्ह इनमधील २४ वर्षीय युवकाचा संशयास्पद मृत्यू; सैयारा सिनेमा पाहून काय घडले? पोलीस हैराण 

व्यावसायिकाचे २५ लाख दिलेच नाही, वरून जिवे मारण्याची धमकी; कुणाल बाकलीवाल पुन्हा अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 23:19 IST

पोलिस माझे काहीच करत नाहीत, म्हणत केटरिंग व्यावसायिकास जिवे मारण्याची धमकी; बारा दिवसांतच कुणाल बाकलीवाल अटकेत

छत्रपती संभाजीनगर : वाहतूक पोलिसांना अरेरावी करून धमकावणाऱ्या बांधकाम व्यावसायिक कुणाल दिलीप बाकलीवाल (३८, रा. बीड बायपास) वर बारा दिवसांतच पुन्हा पोलिसांच्या कोठडीत जाण्याची वेळ आली. व्यावसायिकाची फसवणूक करून गुंडाकडून मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिल्याचा ठपका ठेवत दुसरा गुन्हा दाखल करून सातारा पोलिसांनी त्याला शनिवारी रात्री अटक केली.अमित कासलीवाल (रा. श्रीकृष्णनगर, देवळाई) यांनी याप्रकरणी तक्रार दिली. ५ नाेव्हेंबर २०२२ रोजी बाकलीवालच्या घरी धार्मिक कार्यक्रमासाठी कासलीवाल यांनी अडीच हजार लाेकांच्या जेवणाची व्यवस्था केली. त्याचे १६ लाख रुपये बिल देण्यास बाकलीवालने नकार दिला. पैशांची मागणी केल्यावर बाकलीवाल धमकावत होता. ९ डिसेंबर २०२४ रोजी बाकलीवालने पुन्हा कासलीवाल यांना घरी बोलावले. मुलीच्या वाढदिवसाचे काम केल्यास संपूर्ण पैसे देण्याचे आश्वासन दिले. १७ डिसेंबर रोजी कासलीवाल यांनी ९ लाख ७० हजारांचे काम केले. मात्र, बाकलीवालने तेही पैसे देण्यास नकार दिला.

बाराव्या मजल्यावर मारहाण१२ जानेवारी रोजी बाकलीवालने कासलीवाल यांना कमलनयन बजाज रुग्णालयासमोरील एका अर्धवट इमारतीच्या बाराव्या मजल्यावर बोलावले. दुपारी ३ वाजता तेथे बाकलीवाल, त्याचा चालक, एक नोकर व सागर भानुशाली होते. त्यांनी कासलीवाल यांच्यावर हॉकीस्टीक, लाकडी दांडा, लाथाबुक्क्यांनी हल्ला चढवला. नोकराने त्यांची ३.२ तोळ्यांची सोनसाखळी हिसकावून घेतली. सर्व घटना मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून अनेकांना पाठवली. त्यांना एका खोलीत तीन तास कोंडून ठेवत भावाला बोलावून सुटका केली.

पोलिस माझे काहीच करत नाहीतया सर्व घटनेत बाकलीवाल कासलीवाल यांना सातत्याने ओळखी, ‘बडेजाव’ सांगून धमकावत होता. पोलिस माझे काहीच करत नाहीत, असे सांगून जिवे मारण्याची धमकी दिली. परिणामी, कासलीवाल, त्यांचे कुटुंब दहशतीत होते. २४ जानेवारी रोजी वाहतूक पोलिसांसाेबतच्या हुज्जतीनंतर बाकलीवालला पोलिसांनी गुडघ्यावर बसवत अटक केली. त्यानंतर कासलीवाल यांनी पोलिस आयुक्त प्रवीण पवार, उपायुक्त नितीन बगाटे यांच्याकडे तक्रार केली. बगाटे यांनी शनिवारी साताऱ्याचे निरीक्षक संग्राम ताठे यांना कारवाईचे आदेश दिले. ताठे यांनी गुन्हा दाखल करुन बाकलीवालच्या मुसक्या आवळल्या.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरCrime Newsगुन्हेगारीArrestअटक