करमाड : औरंगाबाद-जालना जिल्ह्याच्या हद्दीवरील करमाड पोलीस ठाण्याच्या वतीने औरंगाबाद-जालना मार्गावर करण्यात आलेल्या नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी कारमधून अडीच लाखांची रोकड जप्त केली.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी केलेल्या नाकाबंदी दरम्यान सोमवारी दुपारी १२.३० वाजता जालनाकडून औरंगाबादकडे जाणाऱ्या कार(एम. एच.२१ बी. एफ.५०२७) ची पोलिसांनी तपासणी केली. यात समोरच्या डिक्कीमधून २ लाख २३ हजार रुपये पोलिसांना मिळून आले. यावेळी कारचालक अमरनाथ रामराव पवार, आकाश शंकरराव चव्हाण,विजय ज्ञानदेव हे होते. पोलिसांनी सदर रक्कम ताब्यात घेतली आहे.