शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती संभाजीनगर राडा प्रकरणी ५०० जणांवर गुन्हा दाखल; १६ पोलीस कर्मचारी जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2023 15:40 IST

 दोन गटात किरकोळ वादाचे रुपांतर दगडफेक आणि जाळपोळ करण्यात झाले

छत्रपती संभाजीनगर: शहरातील किराडपुरा परिसरात बुधवारी मध्यरात्री दोन गटात झालेल्या राडा प्रकरणी पोलिसांनी कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. या प्रकरणी 400 ते 500 अज्ञात व्यक्तींवर शहरातील जिंसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

बुधवारी मध्यरात्री दोन गटात किरकोळ वाद झाला. पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. मात्र, या वादाचे रुपांतर काही वेळात तुफान दगडफेक आणि जाळपोळ करण्यात झाली. बघताबघता किराडपुरा भागात तणाव निर्माण झाला. प्रसंगावधान राखत पोलिसांनी तत्काळ कठोर कारवाई करत अश्रूधुराचे नळकांडे फोडत जमाव पांगवला. यावेळी पोलिसांना हवेत गोळीबार देखील करावा लागला. पहाटे चार वाजता संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आली. दरम्यान, जमावाने सरकारी 7 आणि खाजगी 6 अशा एकूण 13 गाड्या जाळल्या. यात 16 पोलिस अधिकारी व कर्मचारी जखमी झाले आहेत. आज दुपारी या प्रकरणी जिन्सी पोलीस ठाण्यात  400 ते 500 जणांवर दंगल घडवल्याप्रकर्णी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दंगल घडवणे, खुनाचा प्रयत्न करणे, शासकीय अधिकाऱ्यांना मारहाण करणे, शासकीय मालमत्तेचे नुकसान करणे या कलमाखाली गुन्हा दाखल 307, 353, 295, 332, 333, 143, 147, 148, 149, 153 या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

किराडपुरा भागात तणावपूर्ण शांतता किराडपुरा भागात श्रीराम मंदिर आहे. आज राम नवमी असल्याने या मंदिरात भाविकांसह अनेक राजकीय पक्षातील नेत्यांनी हजेरी लावली. रमजान महिना आणि राम नवमीच्या पार्श्वभूमीवर सर्वांनीच शांततेचे आवाहन केले. पोलिसांचा मोठा बंदोबस्त या भागात तैनात करण्यात आला आहे. तसेच पोलीस आयुक्त निखील गुप्ता यांनी समाजकंटकांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद