शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

कोरोना योद्ध्यांची हेळसांड; उपहारगृह बंद असल्याने 'स्वाराती'च्या निवासी डॉक्टरांवर उपासमारीची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2020 6:51 PM

रोना योद्ध्यांची हेळसांड सहन केली जाणार नसून त्याविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा मार्ड संघटनेने दिला आहे.

ठळक मुद्देराजकीय कार्यकर्त्यांच्या हस्तक्षेपामुळे विलंब?आठ दिवसात उपहारगृह सुरु करणार : अधिष्ठाता

अंबाजोगाई : येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाचे उपहारगृह एक महिन्यापासून बंद आहे. ‘मार्ड’च्या शिफारशीनुसार निविदा प्रक्रिया पूर्ण होऊनही उपहारगृह सुरु होत नसल्याने निवासी डॉक्टरांवर उपासमारीची वेळ आली आहे. कोरोना योद्ध्यांची हेळसांड सहन केली जाणार नसून त्याविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा मार्ड संघटनेने दिला आहे.

स्वाराती रुग्णालयात रुग्णसेवेत निवासी डॉक्टरांचा मोठा वाटा आहे. निवासी डॉक्टर पूर्णवेळ सेवा देत असल्यामुळे रुग्णालयातील बहुतांशी विभाग सुस्थितीत आहेत हे नाकारता येणार नाही. सध्या कोरोना विरुद्धच्या लढ्यातही जीव धोक्यात घालून निवासी डॉक्टर पूर्ण योगदान देत आहेत. त्यापैकी काहींना कोरोनाची लागण देखील झाली आहे. तरीसुद्धा उर्वरित डॉक्टर तेवढेच जोमाने काम करतात. मात्र, या योद्ध्यांवरच उपासमारीची वेळ आली आहे. निवासी डॉक्टरांसाठी असलेले उपहारगृह मागील एक महिन्यापासून बंद आहे. हे उपहारगृह कोणाला चालविण्यास द्यायचे किंवा स्वतः चालवायचे याबाबत शिफारस करण्याचे अधिकार निवासी डॉक्टरांच्या संघटनेला  (मार्ड) आहेत. मात्र, मार्डच्या शिफारशीने  निविदेची प्रक्रिया पूर्ण करून महिला उलटून गेला तरीही उपहारगृह सुरु करण्यात आले नाही. त्यामुळे सकस आहाराअभावी रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्याने निवासी डॉक्टर आजारी पडून त्यांना कोरोनाची लागण होत आहे. याबाबत मागील आठ दिवसापासून अधिष्ठातांना वारंवार विनंती करूनही त्यांनी टाळाटाळ केल्याचा आरोप संघटनेने केला आहे. यापुढे कोणत्याही निवासी डॉक्टरांना कोरोनाची बाधा झाल्यास त्याची जिम्मेदारी सर्वस्वी प्रशासनावर असेल. त्यामुळे दोन दिवसात उपहारगृह सुरु न झाल्यास नाईलाजाने संपावर जाण्याचा इशारा संघटनेने मुख्यमंत्री, वैद्यकीय शिक्षणमंत्री, संचालक, जिल्हाधिकारी यांना पाठविलेल्या निवेदनात दिला आहे. या निवेदनावर ‘स्वाराती’च्या मार्डचे अध्यक्ष डॉ. विजय पवार आणि सचिव डॉ. पुष्पदंत रुग्गे यांच्या सह्या आहेत. 

राजकीय कार्यकर्त्यांच्या हस्तक्षेपामुळे विलंब?शासन आदेशानुसार वैद्यकीय महाविद्यालयातील उपहारगृह विद्यार्थी संघटनेला ठेकेदार नेमून अथवा स्वतः चालविण्याचे अधिकार आहेत. त्यानुसार स्वारातीच्या मार्ड संघटनेने नियमानुसार निविदा प्रक्रिया राबवून एका ठेकेदाराची निवड केली आहे. परंतु, एका बड्या राजकीय नेत्याच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या जवळच्या व्यक्तीला उपहारगृह चालविण्यास द्यावी यासाठी हस्तक्षेप करून दबाव आणल्यामुळेच उपहारगृह सुरु होण्यास विलंब होत असल्याचा आरोप संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. आम्ही काय खावे, आमच्या उपहारगृहाचा ठेकेदार कोण असावा हा सर्वस्वी अधिकार आमचा असताना असा हस्तक्षेप कशासाठी असा सवाल त्यांनी केला आहे. 

आठ दिवसात उपहारगृह सुरु करणार : अधिष्ठाता“रुजू झाल्यानंतर मी उपहारगृहाची पाहणी करून माहिती घेतली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या निवासी डॉक्टर जिथे राहत असतील तिथे त्यांना उत्कृष्ट दर्जाचे नाश्ता आणि जेवण देण्याची व्यवस्था करण्यात येईल. मी स्वतः त्यांच्यासोबत जेवणार आहे. या प्रश्नाचा अधिक अभ्यास करून येत्या आठ दिवसांमध्ये उपहारगृह सुरु करण्याचा आमचा प्रयत्न आहे, संघटनेने सहकार्याची भूमिका घ्यावी.”- डॉ. शिवाजी सुक्रे, अधिष्ठाता, स्वाराती वैद्यकीय महाविद्यालय

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याdoctorडॉक्टरAmbajogaiअंबाजोगाई