शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती संभाजीनगरात पत्त्यांचे क्लब रडारवर, नामांकित व्यक्तींसह ७६ ‘गॅम्बलर’ गजाआड

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 11:42 IST

पत्त्यांच्या क्लबवर नामांकित क्षेत्रातील व्यक्तींची उठबस; गुन्हे शाखेच्या पोलिसांचे छत्रपती संभाजीनगरात दोन ठिकाणी छापे, लाखोंची रोकड जप्त

छत्रपती संभाजीनगर : शहर पोलिसांनी शहरातील बड्या पत्त्यांच्या क्लबवर लक्ष केंद्रित केले आहे. गुन्हे शाखेच्या दोन पथकांनी शुक्रवारी रात्री एकाच वेळी धाडी टाकल्या. चिश्तिया चौकात ७६ व पडेगावच्या अड्ड्यावर ७ जुगाऱ्यांना ताब्यात घेतले. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी लाखो रुपयांची मोजदाद सुरू होती.

काही अवैध व्यवसायांच्या विरोधात दीर्घ काळापासून कारवाई होत नव्हती. शहर पोलिस दलात मोठे फेरबदल झाल्यानंतर अशी मोहीम राबवली जाण्याची चर्चा सुरू होतीच. शुक्रवारी गुन्हे शाखेचे निरीक्षक संभाजी पवार यांनी मोठ्या फौजफाट्यासह चिश्तिया चौकातील फिझा हॉटेलच्या इमारतीच्या वरील दोन मजल्यांवर अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या प्रवीण जैस्वालच्या पत्त्याच्या क्लबवर छापा मारला. सहायक निरीक्षक विनायक शेळके, उपनिरीक्षक संदीप सोळुंके, विशाल बोडखे, संदीप शिंदे यांच्यासह त्यांनी सायंकाळी ७ वाजता प्रवेश केला. पोलिस आल्याचे पाहताच क्लबमध्ये हलकल्लोळ उडाला. बाहेर बघ्यांची माेठी गर्दी जमली होती.

नामांकित क्षेत्रातील व्यक्तींची उठबसरात्री ११:३० वाजेपर्यंत २५ पेक्षा अधिक टेबलांवरील लाखो रुपयांची रोकड जप्त करण्याची प्रक्रिया सुरू होती. ७६ जुगाऱ्यांसह क्लबमध्ये काम करणाऱ्या ८ कर्मचाऱ्यांनादेखील आरोपी करण्यात आले. ७६ जुगाऱ्यांमध्ये शासकीय सेवेतील नामांकित व्यक्ती, राजकीय नेत्यांचे सहायक, कार्यालयात काम करणारे कर्मचारीही सापडले.

करोडोंची उलाढालजैस्वालच्या या क्लबवर रोज जवळपास १०० जुगारी पत्ते खेळण्यासाठी येत. २५ पेक्षा अधिक टेबलांवरून रोज कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. जैस्वालसह सर्व जुगाऱ्यांवर सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. पडेगावमध्येही छावणी पोलिसांनी सात जुगाऱ्यांना पकडत ८४ हजार रुपये रोकड आणि १० लाख रुपयांचे मोबाइल, वाहने जप्त केल्याचे सहायक पोलिस निरीक्षक विवेक जाधव यांनी सांगितले.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरCrime Newsगुन्हेगारी