शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

धावती कार पेटली, चालकाच्या प्रसंगावधानामुळे वाचले दोघांचे प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 23:44 IST

कामानिमित्त औरंगाबादेत आलेल्या सिंदखेडराजा (जि. बुलडाणा) येथील एका व्यक्तीच्या धावत्या कारने अचानक पेट घेतला. त्यात कार जळून खाक झाल्याची घटना शनिवारी दुपारी २.४१ वाजेच्या सुमारास जालना रोडवरील एपीआय कॉर्नर येथे घडली. कारच्या इंजिनमधून धूर निघू लागताच कारमालकासह त्यांच्या मित्रांनी वेळीच कार थांबवून खाली उतरल्याने ते बालंबाल बचावले.

औरंगाबाद : कामानिमित्त औरंगाबादेत आलेल्या सिंदखेडराजा (जि. बुलडाणा) येथील एका व्यक्तीच्या धावत्या कारने अचानक पेट घेतला. त्यात कार जळून खाक झाल्याची घटना शनिवारी दुपारी २.४१ वाजेच्या सुमारास जालना रोडवरील एपीआय कॉर्नर येथे घडली. कारच्या इंजिनमधून धूर निघू लागताच कारमालकासह त्यांच्या मित्रांनी वेळीच कार थांबवून खाली उतरल्याने ते बालंबाल बचावले.एमआयडीसी सिडको पोलिसांनी सांगितले की, सिंदखेडराजा येथील गजानन लक्ष्मण कुडके हे कामानिमित्त औरंगाबादेत कारने (एमएच-२८ एएन-४७७४) आले होते. शनिवारी दुपारी पावणेतीन वाजेच्या सुमारास ते सिडको बसस्थानकाकडून चिकलठाण्याकडे कारने जात होते. सिडको पुलाखालून ते प्रवास करीत असताना त्यांच्या कारच्या इंजिनमधून अचानक धूर निघत असल्याचे त्यांना दिसले. त्यानंतर प्रसंगावधान राखून त्यांनी एपीआय कॉर्नर येथील चौकातच कार उभी केली. कुडके आणि त्यांचे मित्र कारमधून खाली उतरले आणि क्षणार्धात आगीने कारला कवेत घेतले. तेथे वाहतूक नियमन करीत असलेल्या महिला पोलीस कॉन्स्टेबल कल्पना मोरे यांनी या घटनेची माहिती तातडीने पोलीस नियंत्रण कक्ष आणि अग्निशमन दलाला दिली. घटनेची माहिती मिळताच सिडको चौकातील सहायक उपनिरीक्षक बी. एस. आरके, पोहेकॉ. जोगदंड, ए. आर. पालवे, घोरपडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. अवघ्या काही मिनिटांत अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी येऊन पेटलेल्या कारची आग विझविली. मात्र, तोपर्यंत संपूर्ण कार जळून कारचा केवळ सांगडाच राहिला होता.चौकटप्रत्यक्षदर्शींनी मोबाईलवर केले चित्रणघटना घडली त्यावेळी तेथून जाणाऱ्या-येणाऱ्या वाहनचालकांनी आणि परिसरातील नागरिकांनी जळणाºया कारचे मोबाईलमध्ये चित्रण केले. वाहनचालकांनी रस्त्यावरच वाहने थांबविल्याने तेथे वाहतूक कोंडी झाली होती. कारची आग विझविल्यानंतर पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली आणि क्रेनच्या मदतीने रस्त्यावरील कारचा सांगडा एमआयडीसी सिडको ठाण्यात हलविला. याप्रकरणी एमआयडीसी सिडको ठाण्यात नोंद करण्यात आल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक अकमल शेख यांनी दिली.

टॅग्स :fireआगAccidentअपघातcarकार