शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

‘औरंगाबाद’साठी निघाला कँडल मार्च; खासदार इम्तियाज जलील यांच्यासह आंदोलकांवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2023 14:53 IST

‘औरंगाबाद था, है, रहेगा, आय लव्ह औरंगाबाद’ अशा घोषवाक्याचे फलक मार्चमध्ये धरण्यात आले होते.

छत्रपती संभाजीनगर : नामांतरविरोधी कृती समितीतर्फे गुरुवारी रात्री निघालेल्या कँडल मार्चला चांगला प्रतिसाद मिळाला. विशेषत: या मार्चमध्ये मुस्लीम महिलांची लक्षणीय उपस्थिती राहिली. खा. इम्तियाज जलील यांनी या मार्चचे नेतृत्व केले. दरम्यान, जमावबंदी असताना विनापरवानगी मोर्चा काढल्याने खा. इम्तियाज जलील यांच्यासह शेकडो आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

काही दिवसांपासून या समितीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू आहे. गुरुवारी रात्री जिल्हाधिकारी कार्यालयापासूनच कँडल मार्चला प्रारंभ झाला. तो भडकल गेटवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ पोहोचला व तेथे मार्चाची सांगता झाली व बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले. या मार्चमध्ये सहभागी झालेले पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आले व तेथे सभा झाली.

औरंगाबाद था, है, रहेगा, आय लव्ह औरंगाबाद’ अशा घोषवाक्याचे फलक मार्चमध्ये धरण्यात आले होते. कँडल व मोबाइलच्या बॅटऱ्यांच्या प्रकाशात निघालेल्या या मार्चमध्ये कोणत्याही घोषणा देण्यात आल्या नाहीत. नामांतराच्या प्रश्नावर मतदान घ्यावे. त्यातून जो निकाल येईल, तो आम्हाला मान्य राहील, अशी भूमिका यावेळी जलील यांनी स्पष्ट केली.

खा. इम्तियाज जलील यांच्यासह आंदोलकांवर गुन्हादरम्यान, गुरुवारी औरंगाबाद नामांतर विरोधी संघर्ष समितीचे संयोजक मोहम्मद अय्युब जहागीरदार यांनी जिल्हाधिकारी कार्यालय ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा भडकल गेटपर्यंत कँडल मार्च करीता पोलिसांकडे परवानगी मागितली होती. मात्र या कँडल मार्चची परवानगी सिटीचौक पोलिसांनी नाकारली होती. तसेच असा मार्च काढू नयेत अशी नोटीस देखील पोलिसांकडून देण्यात आली होती. मात्र तरीही जलील यांच्यासह हजारो लोकांनी रस्त्यावर उतरुन कँडल मार्च काढला. त्यामुळे या प्रकरणी जलील यांच्यासह  शेकडो आंदोलकांवर जमावबंदी आदेशाचं उलंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

रोज शेकडो आक्षेप दाखल २७ मार्चपर्यंत नामांतर विरोधी आक्षेप, हरकती  नोंदविण्याची मुदत आहे. रोज शेकडो आक्षेप विभागीय आयुक्तालयात दाखल करण्यात येत आहेत. 

टॅग्स :Imtiaz Jalilइम्तियाज जलीलAurangabadऔरंगाबादDivisional Commissioner Office Aurangabadऔरंगाबाद विभागीय आयुक्तालय