शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
5
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
6
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
7
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
8
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
9
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
10
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
11
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
12
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
13
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
14
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
15
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
16
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
17
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
18
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
19
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
20
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू

कुत्रा चावलाय, रेबीजचं इंजेक्शन घेतलं तर रक्तदान करता येते का?

By संतोष हिरेमठ | Updated: July 30, 2024 20:24 IST

रक्तदानाने गरजू रुग्णांना जीवदान : शारीरिक अन् मानसिक आरोग्य फिट असेल तर रक्तदान

छत्रपती संभाजीनगर : रक्तदान हे श्रेष्ठदान म्हटले जाते. एखाद्या रुग्णाचे प्राण वाचविण्यासाठी रक्तदान जीवनदान ठरते. त्यामुळे अनेकजण नियमितपणे रक्तदान करतात. मात्र, अनेक कारणांनी इच्छा असूनही रक्तदान करता येत नाही. कुत्रा चावल्यानंतर रेबीजची लस घ्यावी लागते. ही लस घेतल्यानंतर वर्षभर रक्तदान करता येत नाही.

रक्तदान करताना आरोग्य उत्तम असणे गरजेचे असते. त्यामुळे रक्तदान करण्यापूर्वी दात्यांची आवश्यक ती तपासणी केली जात आहे. दात्याविषयी आवश्यक ती माहिती घेतल्यानंतरच रक्त केंद्रातील अधिकारी-कर्मचारी दात्याचे रक्तदान करून घेतात.

रक्तदान करताना उत्तम आरोग्य महत्त्वाचेरक्तदान करताना दात्याचे आरोग्य उत्तम हवे. शारीरिक आरोग्याबरोबर दात्याचे मानसिक आरोग्यही चांगले हवे, असे तज्ज्ञांनी सांगितले.

१८ ते ६५ वर्षे स्वेच्छेने करू शकाल रक्तदानवयाची १८ वर्षे ते ६५ वर्षांपर्यंत रक्तदान करता येते. मात्र, वयाच्या ६० व्या वर्षी पहिल्यांदा रक्तदान करता येत नाही. नियमितपणे रक्तदान करणाऱ्यास ६५ वर्षांपर्यंत रक्तदान करता येते.

एचबी किमान १२.५; वजन हवे ४५ किलोंच्या पुढेरक्तदानासाठी एचबी किमान १२.५ हवे, तर वजन किमान ४५ किलो हवे. ४५ किलो वजनाच्या व्यक्तीला ३५० मिली आणि ५५ किलो वजनाच्या व्यक्तीला ४५० मिली रक्तदान करता येते.

गर्भवतींना रक्तदान करता येते का ?गर्भवतींना रक्तदान करता येत नाही. प्रसूतीनंतरही वर्षभर रक्तदान करता येत नाही. त्याबरोबरच बाळाला स्तनपान सुरू असेल, तरीही रक्तदान करता येत नाही. गर्भपातानंतर किमान सहा महिने रक्तदान करता येत नाही.

दर तीन महिन्यांनी करता येईल रक्तदानपुरुषांना ९० दिवसांनी म्हणजे दर तीन महिन्यांनी रक्तदान करता येते, तर महिलांना दर १२० दिवसांनंतर म्हणजे चार महिन्यांनंतर रक्तदान करता येते.

रक्तदान करण्यापूर्वी हे लक्षात असू द्या- तीन दिवस अगोदर प्रतिजैविके घेतलेली नकोत- गत तीन महिन्यांत मलेरिया झालेला नको- वर्षभरात कावीळ, विषमज्वर झालेला नको- रिक्रिएशनल, अंमली पदार्थांचे सेवन नको- गत वर्षभरात श्वानदंश झालेला नको- गत वर्षभरात रेबीजची लस घेतलेली नको- रक्तदान करण्याआधी १५ दिवस आधी, कॉलरा, टायफाइड, प्लेगची लस घेतलेली असायला नको

या व्यक्तींना करता नाही येत रक्तदानबंदीवान, हृदयाचे आजार, कॅन्सर रुग्ण, ट्रान्सजेंडर, इन्सलिन घेत असेल तर, थाॅयराॅइड रुग्ण ( यू थाॅराईड वगळून), हिपॅटिटीस बी, हिपॅटिसीस सी रुग्ण यांना रक्तदान करता येत नाही.

गरजू रुग्णांसाठी रक्तदान कराशारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सदृढ असणारी व्यक्ती रक्तदान करू शकते. गरजू रुग्णांना रक्त मिळण्यासाठी जास्तीत जास्त दात्यांनी घाटीतील विभागीय रक्त केंद्रात रक्तदान करावे.- डाॅ. भारत सोनवणे, उपअधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी)

टॅग्स :Blood Bankरक्तपेढीAurangabadऔरंगाबाद