शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

‘ओ आजी’ अशी हाक देऊन दीड तोळ्याची सोन्याची पोत हिसकावली

By राम शिनगारे | Updated: May 28, 2023 21:10 IST

क्रांती चौक ते समता नगर रस्त्यावरील घटना : क्रांती चौक ठाण्यात गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगर : मॉर्निंग वॉकला जात असलेल्या वृद्ध महिलेला ‘ओ आजी’ अशी हाक मारून जवळ आलेल्या दोन भामट्यांनी त्यांच्या गळ्यातील दीड तोळ्याची सोन्याची पोत हिसकावल्याची घटना शनिवारी घडली. याप्रकरणी क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.

अजब नगर येथील भीमाबाई लक्ष्णराव बोरसे (७५) क्रांती चौक येथून समता नगरच्या दिशेने सकाळी ६ वाजेच्या सुमारास चालत जात असताना एसबीआय बँकेच्या समोर तोंडाला रुमाल बांधलेले दोन युवक दुचाकीवरून आले. यातील एकाने ‘ओ आजी’ असा आवाज दिला. त्यामुळे बोरसे या जागीच थांबल्या. तेव्हा जवळ आलेल्या एकाने त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मनी असलेली पोत हिसकावली. त्यात १४ ग्रॅम साेन्याचे मणी चोरट्यांच्या हाती लागले.

काही मणी खाली रस्त्यावर पडल्यामुळे वाचले. या घटनेमुळे आजीने आरडाओरड केली. तोपर्यंत चोरटे पसार झाले होते. घटनास्थळाला वरिष्ठ अधिकाऱ्यांसह निरीक्षक संतोष पाटील, उपनिरीक्षक विकास खटके यांच्यासह इतरांनी भेट दिली. वृद्धेचे मंगळसूत्र हिसकावणारे चोरटे नगरच्या दिशेने दुचाकीवरून गेल्याची माहिती पोलिसांना सीसीटीव्हीच्या आधारे समजली. अधिक तपास उपनिरीक्षक खटके करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद