शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूकनगरी बाबतची मंत्रिमंडळाची घोषणा हवेतच; वर्षभरानंतरही जागेचा ताबा नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 13:26 IST

राज्य शासनाच्या विकासकामाच्या निर्णयात प्रशासकीय दिरंगाई होऊन एखादा प्रकल्प कसा रखडतो याचे उत्तम उदाहरण म्हणून करोडी येथील वाहतूकनगराचा उल्लेख करावा लागेल.

ठळक मुद्देकरोडी येथील ग.नं. २४ मधील २४ हेक्टर जागा वाहतूकनगरासाठी देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. मंत्रिमंडळाच्या बैठकीला आता दोन वर्षे पूर्ण होतील, पण वाहतूकनगरासंदर्भात एकही कागद अजून हालला नाही. 

- प्रशांत तेलवाडकर औरंगाबाद : राज्य शासनाच्या विकासकामाच्या निर्णयात प्रशासकीय दिरंगाई होऊन एखादा प्रकल्प कसा रखडतो याचे उत्तम उदाहरण म्हणून करोडी येथील वाहतूकनगराचा उल्लेख करावा लागेल. शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औरंगाबादमध्ये झालेल्या मंत्रिमंडळ  बैठकीत वाहतूकनगर उभारण्याची घोषणा केली होती. त्यासाठी २४ हेक्टर जमीनही उपलब्ध करून दिली होती. संपूर्ण प्रकल्प उभारण्याची जबाबदारी ज्या एमएसआरडीसीवर टाकली होती, तेथील वैचारिक गोंधळामुळेच वाहतूकनगराची प्रक्रियाच रखडली आहे. 

आज देशात ६० टक्के मालवाहतूक ही रस्त्यानेच होते. औरंगाबादेत वाहतूक व्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेत. मागील ८ महिन्यांत बीड बायपास जडवाहनाखाली येऊन १० दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला आहे. जडवाहने शहरात येत असल्याने ती अपघाताला निमंत्रण ठरत आहेत. अशा वेळी शहराला नवीन बायपास व रिंगरोडची आवश्यकता आहे. तसेच  ‘वाहतूकनगरा’ची उभारणी होणे आवश्यक आहे. ४ आॅक्टोबर २०१६ रोजी शहरात मंत्रिमंडळाची बैठक झाली होती. करोडी येथील ग.नं. २४ मधील २४ हेक्टर जागा वाहतूकनगरासाठी देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. या वाहतूकनगरला लागून नागपूर-मुंबई हा समृद्धी मार्ग तयार केला जात आहे. त्याचे काम करणाऱ्या एमएसआरडीसीलाच वाहतूकनगर प्रकल्पाच्या बांधकामाची जबाबदारी मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने देण्यात आली. 

एमएसआरडीसीने महसूल विभागाकडून जागा ताब्यात घेणे. उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाकडून रीतसर जागेची मोजणी करणे. बांधकामाच्या डीपीआरडी (विकास आराखडा) तयार करणे. आराखड्यानुसार आवश्यक त्या निधीची तरतूद शासनाकडे पाठविणे. निधी मिळताच वाहतूकनगरच्या उभारणीस सुरुवात करणे, ही जबाबदारी एमएसआरडीसीची आहे. मात्र, या विभागाने फक्त प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट (पीएमसी) म्हणून मुंबईच्या फोरस्ट्रेक कंपनीची निवड केली. 

याशिवाय दुसरे कोणतेच काम विभागाकडून झाले नाही. परिणामी, मंत्रिमंडळाच्या बैठकीला आता दोन वर्षे पूर्ण होतील, पण वाहतूकनगरासंदर्भात एकही कागद अजून हालला नाही. याचे मुख्य कारण म्हणजे एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांमध्ये निर्माण झालेला वैचारिक गोंधळ होय. एकीकडे अधिकारी मालवाहतूकदार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना प्रशासकीय काम प्रगतिपथावर आहे असे सांगितल्या जात आहे तर दुसरीकडे  वाहतूकनगरच्या जागेवर जनहित याचिका न्यायालयात प्रलंबित असल्याचे उत्तर प्रसिद्धीमाध्यमांना दिले जात आहे.  मात्र, संबंधित वकिलांनी वाहतूकनगर व जनहित याचिकेचा काही संबंध नसल्याचे सांगितले. यामुळे एमएसआरडीसीचे पितळ उघडले पडले आहे. 

वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळविता येईलऔद्योगिक वसाहत व बाजारपेठेमुळे दररोज शहरात ४ हजार ट्रक ये-जा करीत असतात. त्यांना थांबण्यासाठी ‘वाहतूकनगर’ उभारणे आवश्यक आहे. मुख्यमंत्र्यांनी घोषणा करूनही दोन वर्षे पूर्ण होत आहेत, पण अजून काम काही मार्गी लागत नाही, ही खेदाची बाब आहे. एमएसआरडीसीने कामाची गती वाढवावी. वाहतूकनगर झाल्यास शहरातील वाहतूक कोंडीवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळविता येईल. फैय्याज खान, अध्यक्ष, मालवाहतूकदार संघटना 

जनहित याचिकेमुळे काम रखडले करोडी येथे वाहतूक उभारणीची जबाबदारी एमएसआरडीसीवर आहे. अजूनही महसूल विभागाने जागेचा ताबा दिला नाही. तेथे भूमी अभिलेख विभागाने मोजणी करण्यासाठी पत्र दिले, पण काहीच झाले नाही. मुळात ती जागा विधि महाविद्यालयाला देण्यात यावी, यासाठी जनहित याचिका दाखल झाली आहे. यामुळे काम रखडले आहे. - विक्रम जाधव, कार्यकारी अभियंता, एमएसआरडीसी

वाहतूकनगरचा जनहित याचिकेशी संबंध नाही करोडी येथील १८७ एकर गायरान जमिनीपैकी ५० एकर जागा नॅशनल लॉ युनिव्हर्ससिटीसाठी २०१० मध्ये देण्यात आली होती. उच्च तंत्रशिक्षण विभागाकडे दिली होती. मात्र, तेथे पाण्याची उपलब्धता नसल्याने त्याऐवजी कांचनवाडी येथील वाल्मी परिसरातील गट नं.१९ येथील जागा मिळावी यासाठी जनहित याचिका दाखल केली आहे. या जनहित याचिकेचा व मालवाहतूकनगरचा काहीही संबंध नाही. - अ‍ॅड.सतीश तळेकर

 

टॅग्स :State Governmentराज्य सरकारTrafficवाहतूक कोंडीAurangabadऔरंगाबादChief Ministerमुख्यमंत्री