शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

बसपोर्ट, मॉडेल स्टेशनचे काम रखडले; औरंगाबादच्या वाहतूक क्षेत्राच्या विकासाला कोरोनामुळे खीळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2020 18:52 IST

बसपोर्ट, मॉडेल स्टेशनचा दुसरा टप्पा, नव्या विमानसेवा, आंतरराष्ट्रीय कार्गो सेवा लांबणीवर

ठळक मुद्देबसपोर्ट आणि मध्यवर्ती बसस्थानकाच्या पुनर्बांधणीचे २८ ऑगस्ट २०१९ रोजी भूमिपूजन झालेमॉडेल रेल्वेस्टेशनच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामाचे ३ जुलै २०१५ रोजी भूमिपूजनही झाले

- संतोष हिरेमठ

औरंगाबाद : बससेवा, रेल्वे, विमान या दळणवळण सुविधा परिपूर्ण असल्यावर कोणत्याही शहराचा विकास फास्ट ट्रॅकवर येतो. औरंगाबादेत वाहतूक क्षेत्रासाठी अनेक नव्या गोष्टींची घोषणा झाली. मात्र, काही गोष्टी अर्धवट राहिल्या, तर काही कागदावरच. त्यात आता कोरोनाचाही फटका. त्यामुळे वाहतूक क्षेत्राच्या विकासाला खीळ बसली आहे.

औरंगाबादेत सिडको बसस्थानकाच्या जागी उभारण्यात येणाऱ्या बसपोर्ट आणि मध्यवर्ती बसस्थानकाच्या पुनर्बांधणीचे २८ ऑगस्ट २०१९ रोजी भूमिपूजन झाले; परंतु अद्यापही हे काम सुरू झालेले नाही. मध्यवर्ती बसस्थानकाच्या नवीन इमारतीसाठी बांधकाम शुल्क माफ करावे, अशी मागणी एसटी महामंडळाने मनपाकडे केली आहे; परंतु मनपाने त्यासंदर्भात निर्णय न घेतल्याने बसस्थानक उभारणीच्या कामाला अद्याप मुहूर्त मिळालेला नाही. विभाग नियंत्रण अरुण सिया म्हणाले, कोरोनामुळे बसपोर्ट, बसस्थानक उभारणीवर काही परिणाम होणार नाही. लवकरच काम सुरू होईल.मॉडेल रेल्वेस्टेशनचा पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर ३ जुलै २०१५ रोजी दुसऱ्या टप्प्यातील जुन्या इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजनही झाले; परंतु अजूनही हे काम सुरूच झालेले नाही. नव्या रेल्वे सुरू होण्यासाठी ही सुविधा गरजेची आहे; परंतु कोरोनामुळे याचेही प्रत्यक्षात काम लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. मराठवाडा रेल्वे कृती समितीचे अध्यक्ष अनंत बोरकर म्हणाले, यासाठी लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा केला पाहिजे.

विमानतळ सज्ज, विमानसेवा कंपन्यांनी पुढे येण्याचे आवाहनविमानतळावरील जुन्या टर्मिनल इमारतीचे कार्गो टर्मिनलमध्ये रूपांतर करून १ जून २०१६ पासून या ठिकाणाहून देशांतर्गत एअर कार्गो सेवेला सुरुवात करण्यात आली. आता विमानतळावरून आंतरराष्ट्रीय एअर कार्गो सेवेची प्रतीक्षा आहे. विविध देशांसाठी आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्याच्या हालचाली झाल्या होत्या; परंतु आता कोरोनामुळे आंतरराष्ट्रीय विमानांच्या उड्डाणावर निर्बंध आले आहे. शहराला मुंबई, दिल्ली, हैदराबादची सध्या हवाई कनेक्टिव्हिटी आहे. किमान इतर नव्या शहरांना कधी विमानसेवा सुरू होतील, याकडे लक्ष लागले आहे. विमानतळाचे संचालक डी. जी साळवे म्हणाले, विमानतळ सेवेसाठी सज्ज आहे. विमान कंपन्यांनी त्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादtourismपर्यटनfundsनिधीcorona virusकोरोना वायरस बातम्या