शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

व्यावसायिकांनो सावध व्हा! कर चुकवेगिरीवर ‘एआय’ची नजर; प्रत्येक व्यवहाराचे 'डेटा ॲनालिसिस'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 18:03 IST

जीएसटी व आयकर विभाग तंत्रज्ञानाच्या मदतीने जमवित आहेत उलाढालीची माहिती

- प्रशांत तेलवाडकर

छत्रपती संभाजीनगर : काही व्यावसायिक मोठ्या उलाढाली करूनहीजीएसटी व आयकर न भरता सरकारपासून आपली कमाई लपवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, आता तंत्रज्ञानाच्या मदतीने शासनाने डिजिटल व्यवहारांवर नजर ठेवण्यास सुरुवात केली आहे. यूपीआय, क्यूआर कोड, कार्ड पेमेंटमधून मिळणाऱ्या डेटा ॲनालिसिसच्या आधारे आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) प्रणाली करचुकवेगिरी उजेडात आणत आहे आणि त्याद्वारे कारवाई केली जात आहे.

डेटा ॲनालिसिसच्या आधारे शोधले ७१ बोगस करदातेराज्य जीएसटी विभागाच्या छत्रपती संभाजीनगर सहआयुक्तालयाने २०२४-२५ या आर्थिक वर्षात एआयने दिलेल्या डेटा ॲनालिसिसद्वारे ७१ बोगस करदात्यांना शोधण्यात यश आले तसेच नुकतीच देशातील १५० ठिकाणी आयकर विभागाने छापेमारी केली, ज्यात एआयनेही महत्त्वाची भूमिका बजावली.

४० लाखांवर उलाढाल असल्यास जीएसटी नोंदणी कराव्यवसाय छोटा वा मध्यम असो, वस्तू विक्रीत वार्षिक उलाढाल ४० लाखांपेक्षा जास्त असेल तर जीएसटीमध्ये नोंदणी करावी लागेल तसेच सेवा उद्योगात वार्षिक उलाढाल २० लाखांपेक्षा जास्त असल्यासही जीएसटी नोंदणी करणे आवश्यक आहे.

यूपीआय व्यवहारांवर नजरकोरोनानंतर मोठ्या प्रमाणावर ऑनलाइन ऑर्डर, घरपोच सेवा आणि ऑनलाइन पेमेंट्स होत आहेत. प्रति १०० पैकी ६० टक्के व्यवहार यूपीआयच्या माध्यमातून होत आहेत. त्यामुळे प्रत्येक व्यवहाराची नोंद डिजिटल स्वरूपात होऊ लागली आहे. त्यामुळे आता अगदी छोटे दुकान असो वा मोठा उद्योग, सर्व व्यवहारांचा डेटा सरकारच्या नजरेत येतो आहे. करचुकवेगिरी करण्याचा प्रयत्न ‘स्मार्ट’ यंत्रणांपुढे निष्फळ ठरत आहे. त्यामुळे व्यावसायिकांनी पारदर्शक व्यवहाराकडे वळण्याची हीच वेळ आहे, अन्यथा कायदेशीर कारवाई अटळ आहे.

जीएसटी नोंदणी कराकरचुकवेगिरी करण्याचा प्रयत्न ‘स्मार्ट’ यंत्रणांपुढे निष्फळ ठरत आहे. त्यामुळे व्यावसायिकांनी पारदर्शक व्यवहाराकडे वळण्याची हीच वेळ आहे. तुम्ही जीएसटी करदात्यांच्या नियमांत आल्यास स्वतःहून नोंदणी करा.- अभिजीत राऊत, सहआयुक्त, राज्य जीएसटी, छत्रपती संभाजीनगर

जिल्ह्यातील जीएसटी करदात्यांची संख्या- एकूण जीएसटी करदाते : २६,७९०- मोठ्या व्यवसायातील करदाते : ७७२- मध्यम व्यवसायातील करदाते : ३,३८०- लघु व्यवसायातील करदाते : २२,६३८

टॅग्स :GSTजीएसटीTaxकरArtificial Intelligenceआर्टिफिशिअल इंटेलिजन्सchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर