शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

सर्वात वर्दळीच्या क्रांतीचौकात चोरट्यांचा धुमाकूळ, चार शटर उचकटून चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 19:04 IST

 कार्यालयात फुटलेल्या काचांचा खच पडला होता. या कार्यालयातील हार्ड डिस्क आणि मोबाईल चोरट्यांनी नेला.

ठळक मुद्देएका कार्यालयातून ५ हजार ५०० रुपयांची रोकड तर दुसऱ्यामधून मोबाईल व हार्डडिस्क पळविली

औरंगाबाद : रात्रंदिवस वर्दळीच्या क्रांतीचौकातील चार शटर उचकटून चोरट्यांनी रोख ५ हजार ५०० रुपये, मोबाईल आणि संगणकाची हार्ड डिस्क चोरून नेली, तर जुना मोंढ्यातील खाद्यतेलाचे दुकान फोडणाऱ्या दोन चोरट्यांना गस्तीवरील पोलिसांनी रंगेहात पकडले.  या दोन्ही घटना रविवारी रात्री १ ते पहाटे ४ या वेळेत झाल्या. या घटनांमुळे व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली.

माजी उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांचे शिवराज असोसिएट आणि शिवराज केबल ब्रॉडबॅण्ड अ‍ॅण्ड इंटरनेट प्रा. लि. ही दोन कार्यालये क्रांतीचौक पेट्रोलपंपाशेजारील गल्लीत आहेत. त्यांचा व्यवस्थापक विजय खंडागळे आणि कर्मचाऱ्यांनी शनिवारी सायंकाळी कार्यालये बंद केली आणि ते घरी गेले.  रविवारी मध्यरात्री दोन्ही कार्यालयाचे शटर उचकटून चोरटे आत घुसले. शिवराज ब्रॉडबॅण्ड कार्यालयातील  आलमारीतील रोख ५ हजार ५०० रुपये चोरून नेले व दोन्ही कार्यालयांतील सामान अस्ताव्यस्त फेकले. तेथे अधिक रक्कम न मिळाल्याने चोरट्यांनी त्यांचा मोर्चा या कार्यालयासमोरील इराणी कॅफेकडे वळवला.

या कॅफेच्या तळमजल्यातील कॅड एज दुकानाचे शटर उचकटून आत घुसले. तेथेही रोख रक्कम नव्हती. किमती ऐवज न मिळाल्याने चोरटे पहिल्या मजल्यावरील इराणी कॅफेत घुसले. या कॅफेच्या काऊंटरचे लॉकर तोडून त्यांनी शोधाशोध केली. मात्र,  लॉकडाऊनपासून कॅफे बंद असल्याने तेथे निव्वळ धूळच होती. नंतर चोरट्यांनी कॅफेच्या वरच्या मजल्यावरील वेलवर्थ क्रिएटिव्ह मीडिया या जाहिरात कंपनीचे कार्यालय फोडले.  कार्यालयात फुटलेल्या काचांचा खच पडला होता. या कार्यालयातील हार्ड डिस्क आणि मोबाईल चोरट्यांनी नेला. अरविंद हौजवाला यांच्या केबिनमधील सामान अस्ताव्यस्त केले. सोमवारी सकाळी शेजारील कुटुंब सुभाष नगरकर यांना शटर उचकटलेले दिसल्यावर त्यांनी जंजाळ यांना फोन करून घटना कळविली.

टॅग्स :theftचोरीAurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी