शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

'बस आगारांमध्येच'; कोरोना संकटाने १३३ कोटींनी ‘एसटी’ खड्ड्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 19:52 IST

तब्बल १५१ दिवस ठप्प असलेली एसटी महामंडळाची आंतरजिल्हा प्रवासी वाहतूक २० ऑगस्ट २०२० पासून सुरू झाली; परंतु ऑक्टोबरपर्यंतही एसटीची सेवा पूर्वपदावर आली नव्हती.

ठळक मुद्देकोरोनाच्या १४ महिन्यांत २६८ दिवस रोज ५० लाखांचे नुकसान

- संतोष हिरेमठ

औरंगाबाद : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पहिल्या लाटेपाठाेपाठ दुसऱ्या लाटेतही ‘एसटी’च्या वाहतुकीवर निर्बंध लागले. परिणामी, जिल्ह्यात महामंडळाची बस ठप्प झाली. कोरोनाच्या गेल्या १४ महिन्यांत एसटी महामंडळाच्या औरंगाबाद विभागाला २६८ दिवस रोज ५० लाखांच्या नुकसानीला ताेंड द्यावे लागले. यातून तब्बल १३३ कोटींनी औरंगाबादची ‘एसटी’ खड्ड्यात गेली. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रवासी वाहतुकीवर निर्बंध गरजेचे आहेत; पण त्यासाठी ‘एसटी’ला कोट्यवधींच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागले.

गतवर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर शासनाने २३ मार्चपासून लाॅकडाऊन जारी केले हाेते. परिणामी, एसटी सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली. तब्बल १५१ दिवस ठप्प असलेली एसटी महामंडळाची आंतरजिल्हा प्रवासी वाहतूक २० ऑगस्ट २०२० पासून सुरू झाली; परंतु ऑक्टोबरपर्यंतही एसटीची सेवा पूर्वपदावर आली नव्हती. त्यानंतर पुढील ५ महिने एसटीची सेवा रुळावर येत नाही तोच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने डोके वर काढले. त्यामुळे ‘एसटी’च्या वाहतुकीवर पुन्हा निर्बंध आले. अत्यावश्यक सेवेसाठीच ‘एसटी’ला मुभा देण्यात आली. ‘एसटी’ने मालवाहतूकही सुरू केली; परंतु त्यातून ‘एसटी’चे कोट्यवधी रुपयांचे नुकसान भरून निघेल, अशी स्थिती नाही.

वैयक्तिक वाहनांनी प्रवासावर भरगतवर्षी ऑक्टोबरपासून एसटीची सेवा सुरळीत झाली. मात्र, कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी वैयक्तिक वाहनांनी प्रवास करण्यावर भर दिला. जुन्या चारचाकी खरेदीचे प्रमाण वाढले. त्यामुळे ‘एसटी’ची प्रवासी संख्या कमी झाली. डिझेल भरण्यासाठीही पैसे नसल्याची स्थिती काही आगारांची झाली होती. अशा परिस्थितीत गतवर्षी २२३ आणि यावर्षी मागील ४५ दिवस एसटी महामंडळाच्या औरंगाबाद विभागाला आर्थिक फटका बसला. जिल्ह्यात एसटी महामंडळाचे तब्बल २ हजार ९०० कर्मचारी आहे.

रोज ५० लाख रुपयांचे नुकसानकोरोनाच्या पार्श्वभूमीवर गतवर्षी लाॅकडाऊन हाेते. जवळपास २२३ दिवस बससेवेवर परिणाम झाला. यातून १११ कोटींचे नुकसान झाले. यावर्षी गेल्या ४५ दिवसांत २२ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. या कालावधीत प्रत्येक दिवसाला साधारण ५० लाख रुपयांचे नुकसान झाले.-अरुण सिया, विभाग नियंत्रक, एसटी महामंडळ

जिल्ह्यातील ‘एसटी’च्या नुकसानीची स्थिती- वर्ष २०२०-नुकसानीचे दिवस - २२३-एकूण नुकसान - १११ कोटी

- वर्ष २०२१- नुकसानीचे दिवस - ४५- एकूण नुकसान - २३ कोटी

जिल्ह्यातील स्थिती- एकूण बस - ५५०- चालक - १,२१३- वाहक - ९३१- एकूण कर्मचारी - २,९००- कोरोनापूर्वी रोजच्या फेऱ्या - ६,२२२

एकट्या मध्यवर्ती बसस्थानकाची स्थिती- रोजचे नुकसान - १५ ते २० लाख रुपये- चालक - २५६- वाहक - १७७- एकूण कर्मचारी - ५५३

टॅग्स :state transportएसटीAurangabadऔरंगाबादcorona virusकोरोना वायरस बातम्या