शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

बस चालकाचा ओव्हरटेकचा प्रयत्न, ट्रिपलसीट मित्रांचा तोल गेला, एकाचा जागीच मृत्यू

By सुमित डोळे | Updated: March 20, 2024 11:39 IST

ट्रिपलसीट दुचाकीस्वारांच्या अपघाताची दोन महिन्यांत तिसरी घटना, शिक्षक दाम्पत्याने एकुलता एक मुलगा गमावला.

छत्रपती संभाजीनगर : सलूनमध्ये केस कापून घरी परतणाऱ्या ट्रिपलसीट मित्रांच्या मोपेड दुचाकीला खासगी बस चालकाने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. यामुळे दुचाकीचा तोल जाऊन तिन्ही मित्र रस्त्यावर कोसळले. यात दोन मित्र किरकोळ जखमी झाले. मात्र, शेवटी बसलेल्या यश नरेश खडसे (२३) डोक्यावर पडल्याने जागीच मृत्यू झाला. सोमवारी रात्री ११ वाजता बीडबायपासवर हिवाळे लॉन्ससमोर हा अपघात घडला.

यश आईवडील, मोठ्या बहिणीसह देवळाई परिसरातील स्वर्ग रेसिडेन्सीमध्ये राहत होता. सोमवारी रात्री ९ वाजता यश अन्य दोन मित्रांसह तो मोपेड दुचाकीवरून ते रेणुका माता मंदिर कमानीजवळील सलूनमध्ये केस कापण्यासाठी गेले होते. ११ वाजेपर्यंत सलूनमध्ये थांबल्यानंतर तिघेही पुन्हा बीडबायपासमार्गे देवळाई चौकाच्या दिशेने जात होते. मात्र, हिवाळे लॉन्स व न्यू सुखसागर हॉटेलच्या दरम्यान डाव्या बाजूने जात असताना त्यांना जगदंबा ट्रॅव्हल्स कंपनीच्या बस चालकाने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. यात मुलांच्या दुचाकीचा तोल जाऊन रस्त्यावर कोसळले, अन्य मित्र किरकोळ जखमी झाले. मात्र, सर्वात शेवटी बसलेला यश थेट मागे डोक्यावर कोसळल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती कळताच, सातारा पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक नंदकुमार भंडारी, विष्णू जगदाळे यांनी धाव घेतली.

सरकारी अधिकारी बनायचे होतेयशला एक माेठी बहीण असून, आई-वडिलांना एकुलता एक मुलगा होता. त्याचे आईवडील दोघेही शिक्षक आहेत. अभियांत्रिकी उत्तीर्ण झाल्यानंतर शासकीय सेवेत अधिकारी होण्याचे स्वप्न पाहणारा यश स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. त्याचे अन्य दोन मित्रही अभियांत्रिकीचे शिक्षण घेतात. सोमवारी रात्री ९ वाजेपर्यंत कुटुंबासोबत वेळ घालविलेल्या यशच्या कुटुंबावर मात्र क्षणात दु:खाचा डोंगर कोसळला.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAccidentअपघात