शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

बऱ्हाणपूरच्या भाविकांचा सिल्लोडजवळ अपघात; स्टेरिंगरॉड तुटल्याने जीप उलटली, चालकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 18:39 IST

भरधाव जीप स्टेरिंगरॉड तुटल्याने दुभाजकाला धडकून उलटली. चालकाचा जागीच मृत्यू, ११ प्रवासी जखमी

- श्यामकुमार पुरेसिल्लोड (छत्रपती संभाजीनगर): तालुक्यातील निल्लोड फाट्यावर भरधाव जाणाऱ्या जीप (क्रमांक एमपी ६८ झेडडी ३०२७ ) अचानक स्टेरिंगरॉड तुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटून दुभाजकावर धडकली. या अपघातात जीप चालक जागीच ठार झाला तर ११ प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत. मृत आणि जखमी सर्व बऱ्हाणपूर येथील रहिवासी आहेत. हा अपघात आज पहाटे ३:३० वाजेच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर ते जळगाव रस्त्यावरील निल्लोड फाट्यावर झाला. 

बऱ्हाणपूर येथील भाविक चार जीपमधून कानिफनाथ यांचे दर्शन करण्यासाठी बुधवारी नगर जिल्ह्यात आले होते. दर्शन झाल्यानंतर सर्व भाविक रात्री परत बऱ्हाणपूरकडे निघाले. छत्रपती संभाजीनगर ते जळगाव रस्त्यावरील निल्लोड फाट्यावर पहाटे ३. ३० वाजता भरधाव वेगातील एक जीप स्टेरिंगरॉड तुटल्याने दुभाजकावर धडकली. पाठीमागून येणाऱ्या इतर भाविकांच्या निदर्शनास अपघात आला. जीप थांबवून भाविकांनी अपघाताची माहिती वडोद बाजार पोलिसांना दिली. पोलीस उपनिरीक्षक बाप्पासाहेब झिंझुरडे, पोहेकॉ धनराज खाकरे पाटील, शैलेश गोरे यांनी घटनास्थळी जाऊन नागरिकांच्या मदतीने जखमींना  सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. अर्चना सपकाल , डॉ. अजिंक्य इंगोले यांनी प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी काहीं जखमींना छत्रपती संभाजीनगर, तर काहींना बऱ्हाणपूर येथील जिल्हा रुग्णालयात रवाना केले. या प्रकरणी वडोदबाजार पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद घेण्यात आली आहे. सहायक पोलीस निरीक्षक सुनील इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ धनराज खाकरे पाटील हे या अपघाताचा तपास करत आहे.

मृत आणि जखमी मध्यप्रदेशातीलमृत जीप चालकाचे नाव नारायण कडू सपकाळ ( ५३ वर्ष रा. निमगावरेहता ता.जि. बऱ्हाणपूर राज्य (मध्यप्रदेश) असे आहे. तर गंभीर जखमी प्रवाशांचे नावे अशी: योगेश बाबुराव कोल्हे  वय ३० वर्ष रा. शिरगाव बऱ्हाणपूर , रुपचंद लहानु कोल्हे वय ४० वर्ष रा. शिरगाव ,सोपान बाबुराव महाजन वय ६० वर्ष रा.हाथरुन ,योगेश काशिराम धनगर वय ४० वर्ष रा.हाथरुन ,तनीषा कृष्णा चौधरी  वय १६ वर्ष रा. शाहपुर ,वैष्णवी कैलास पाटिल  वय १७ वर्ष रा.अतनुर ,कार्तिक कैलास पाटिल  वय २० वर्ष रा.अतनुर ,दुर्गाबाई कैलास पाटिल  वय ४० वर्ष रा.अतनुर ,अनुष्का योगेश धनगर  वय १२ वर्ष रा.अतनुर ,सुवर्णा कृष्णा चौधरी  वय ३५ वर्ष रा. शाहपुर , विशाल विलास पाटील वय २४ वर्ष रा.अतनूर बऱ्हाणपूर  (मध्यप्रदेश) असे आहे.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरAccidentअपघात