शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

एमआयडीसीत गुंडगिरी वाढली; कंत्राट देण्याच्या कारणावरून व्यवस्थापकाला रस्त्यात अडवून मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2021 16:31 IST

Bullying increased in MIDC area of Aurangabad : टोळके व्यवस्थापकास बेदम मारहाण करुन घटनास्थळावरुन पसार झाले.

ठळक मुद्देकंपनीत कामगार पुरविण्याचा ठेका देण्याच्या कारणावरुन हल्ला झाल्याचा आरोप

वाळूज महानगर : औद्योगिक परिसरात गुंड व ब्लॅकमेल करणाऱ्यांची दहशत वाढतच चालली आहे. भोगले कंपनीत कामगार आणि व्यवस्थापकातील वादाची घटना ताजी असताना आता एका कंपनीच्या एचआर व्यवस्थापकाला रस्त्यात अडवुन १० ते १५ जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण केल्याची घटना मंगळवार (दि.१०) सांयकाळी ७ वाजेच्या सुमारास वाळूज उद्योगनगरीत  ( Waluj MIDC ) घडली. या मारहाणीत शिरीषकुमार राजेभोसले (३९ रा.नक्षत्रवाडी) हे जखमी झाले आहे. कंपनीत कामगार पुरविण्याचा ठेका देण्याच्या कारणावरुन ही मारहाण झाल्याचा आरोप जखमी व्यवस्थापक भोसले यांनी केला आहे.

हेही वाचा - उद्योगनगरीत गुंड, 'ब्लॅकमेलर' रोखा; वाळूज एमआयडीसीतील उद्योजकांची प्रशासनाकडे मागणी

या विषयी अधिक माहिती अशी की, वाळूज एमआयडीसीतील जोगेश्वरी शिवारात असलेल्या श्रीगणेश कोटींग या कंपनीत शिरीषकुमार राजेभोसले (रा.नक्षत्रवाडी ता.जि.औरंगाबाद) हे एचआर व्यवस्थापक म्हणून काम करतात. मंगळवार (दि.१०) सांयकाळी कंपनीतील कामकाज आटोपल्यानंतर दुचाकीवरून नक्षत्रवाडी येथील घराकडे निघाले होते. काही अंतरावर एम-सेक्टरजवळ दुचाकीवरुन आलेल्या १० ते १५ जणांच्या टोळक्याने राजेभोसले यांना अडवले. दुचाकी अडवून त्यांच्याशी वाद घालत लाठ्या-काठ्याने मारहाण करण्यास सुरवात केली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे राजेभोसले यांनी मदतीसाठी आरडा-ओरडा करण्यास सुरवात केली. यावेळी टोळके राजेभोसले यांना बेदम मारहाण करुन घटनास्थळावरुन पसार झाले. या मारहाणीत राजेभोसले यांचा डावा हात फॅक्चर झाला आहे. डोळ्याजवळ ठोसे लगावल्याने मोठी जखम झाली असून सुदैवाने डोळा बचावला आहे. याशिवाय मुकामार लागल्याचे राजेभोसले यांनी सांगितले.

ठेका देण्याच्या कारणावरुन धमक्याश्री गणेश कोटींग या कंपनीत जवळपास ३०० ते ४०० कामगार काम करतात. या कंपनीत कंत्राटी कामगार पुरविण्याचा ठेका आम्हाला द्या, या कारणावरुन विविध पक्षाच्या कार्यकर्त्याकडून धमक्या दिल्या जात असल्याचे राजेभोसले यांनी सांगितले. आम्हाला काम न दिल्यास गंभीर परिणाम होतील अशा धमक्या राजेभोसले यांना दिल्या जात होत्या. आपले कुणासोबत वैर नसतांना अनोळखी व्यक्तीने मारहाण केल्याने वरिष्ठांशी चर्चा करुन पोलिस ठाण्यात तक्रार देणार असल्याचे राजेभोसले यांनी सांगितले.

टॅग्स :Waluj MIDCवाळूज एमआयडीसीAurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी