शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

शहर पाणीपुरवठा योजनेसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने दिले ६८२ कोटींचे अंदाजपत्रक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 19:32 IST

औरंगाबाद महापालिकेने २०११ मध्ये तयार केलेल्या समांतर जलवाहिनी योजनेचे काम बंद पाडले आहे.

ठळक मुद्देमराठवाडा विकास मंडळाची बुधवारी राज्यपालांकडे बैठक लातूरसाठी ५८२ कोटींची जलवाहिनी 

औरंगाबाद : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने (एमजीपी) औरंगाबाद शहर पाणीपुरवठा योजनेसाठी ६८२ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक तयार केले आहे. ते अंदाजपत्रक सोमवारी मराठवाडा विकास मंडळ अध्यक्ष आणि सदस्यांकडे सुपूर्द करण्यात आले. सोबतच लातूर शहर पाणीपुरवठ्यासाठी ५८२ कोटी रुपयांतून जलवाहिनीचे अंदाजपत्रक सादर करण्यात आले आहे. हे दोन्ही अंदाजपत्रक घेऊन बुधवारी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्याकडे मराठवाडा विकास मंडळाची बैठक होईल, अशी माहिती अध्यक्ष डॉ. भागवत कराड यांनी दिली. 

औरंगाबाद महापालिकेने २०११ मध्ये तयार केलेल्या समांतर जलवाहिनी योजनेचे काम बंद पाडले आहे. त्यामुळे जीवन प्राधिकरणाकडून अंदाजपत्रक तयार करून त्याआधारे योजना बनविण्यात यावी, असे मत मराठवाडा विकास मंडळाचे झाले. त्यानंतर प्राधिकरणाकडे अंदाजपत्रकासाठी विकास मंडळाने प्रस्ताव पाठविला. त्यानुसार ६८२ कोटी रुपयांतून जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत जलवाहिनी टाकण्याचे अंदाजपत्रक एमजीपीने तयार केले आहे. दररोज पाणी देण्यासाठी तसेच पुढील २० वर्षांच्या नियोजनासाठी ती योजना असेल. एमजीपीने अंदाजपत्रक तयार केले आहे. 

योजनेचा डीपीआर करण्यासाठी वेगळ्या निधीची तरतूद करावी लागेल. लातूरसाठी उजनीतून पाणी देण्याची योजना राबविली, तर त्यासाठी ५८२ कोटी रुपये लागतील. मुख्यमंत्री आणि राज्यपालांची बुधवारी भेट घेऊन अर्थसंकल्पात दोन्ही योजनांसाठी तरतूद करण्याची मागणी असेल, असे डॉ. कराड यांनी स्पष्ट केले.

समांतरचे पॅकअपसमांतर जलवाहिनीचे पॅकअप झाले आहे. २०११ पासून योजनेसाठी केंद्र व राज्य शासनाने दिलेला निधी बँकेत पडून आहे. व्याजासह ती रक्कम ३५० कोटींच्या आसपास गेली आहे. राज्य शासनाने शहर पाणीपुरवठ्यासाठी एमजीपीच्या अंदाजपत्रकाचा विचार केला, तर मराठवाडा विकास मंडळाला नोडल एजन्सी नेमून एमजीपीमार्फत औरंगाबाद आणि लातूरसाठी पाणीपुरवठा योजना राबविण्याचा निर्णय होऊ शकतो. मनपाला दिलेले अनुदान राज्य शासन सदरील योजनेमध्ये वळवू शकते. यासाठी केंद्र शासनासोबत राज्य शासनाने पत्रव्यवहार करून संमती घेतल्यास औरंगाबाद शहराचा पाणीपुरवठ्याचा प्रश्न मिटणे शक्य होणार आहे. 

टॅग्स :WaterपाणीParallel Waterline Aurangabadसमांतर जलवाहिनी औरंगाबादMarathwadaमराठवाडाAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका