शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange: '...तोपर्यंत मुंबई सोडणार नाही', नोटीसनंतर मनोज जरांगेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना इशारा
2
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: आझाद मैदानावर आंदोलन करावे, इतर कुठेही बसू नये; मुंबई पोलिसांचे आंदोलकांना आवाहन
3
औषधांवर २०० टक्क्यांपर्यंत टॅरिफ लावण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्लॅन; भारतावर किती होणार परिणाम?
4
आंदोलनात बेकायदेशीर कृत्ये, लवकरात लवकर मैदान रिकामं करा; मनोज जरांगेंना पाठवलेल्या पोलिसांच्या नोटीसमध्ये काय?
5
भारत-रशिया मैत्री पाहून अमेरिका भडकली, ट्रम्प यांचे सल्लागार संतापले; म्हणाले, 'आमच्यासोबत...!'
6
GST बैठकीच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात तेजी; रिलायन्समध्ये सर्वाधिक वाढ तर 'हे' स्टॉक्स घसरले
7
Parivartani Ekadashi 2025: परिवर्तनी एकादशी; चातुर्मासाचा मध्यंतर, यादिवशी श्रीहरी श्रीविष्णूंची बदलतात कूस!
8
Punjab Flood: अर्धा पंजाब पाण्यात! १३०० गावांना पुराचा वेढा, हजारो लोक बेघर; २९ जणांचा मृत्यू
9
Maharashtra Rain: राज्यात पाऊस पुन्हा धुमाकूळ घालणार, आठ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
10
गणेशोत्सव साजरा करत नाही आलिया? ट्रोल झाल्यानंतर दिलं सडेतोड उत्तर; फोटो शेअर करत म्हणाली...
11
अनंत चतुर्दशी २०२५: गणेशोत्सवाची सांगता; पाहा, मान्यता, २०२६ मध्ये कधी येणार गणपती बाप्पा?
12
Mitchell Starc T20I Retirement : आगामी टी-२० वर्ल्ड कप आधी स्टार गोलंदाजाने घेतला निवृत्तीचा निर्णय; जाणून घ्या त्यामागचं कारण
13
४ राजयोगात परिवर्तिनी एकादशी: ९ राशींचे कल्याण-भरभराट, सुबत्ता-शुभ-लाभ; धनलक्ष्मी प्रसन्न!
14
'ही' आंतरराष्ट्रीय बँक भारतातून गाशा गुंडाळण्याच्या तयारीत? ग्राहकांच्या पैशांचं काय होणार?
15
Mumbai: मुंबईत मोठी वाहतूक कोंडी; कार्यालय गाठता गाठता नोकरदारांच्या नाकीनऊ!
16
तुम्हाला कन्नड येते का? मुख्यमंत्र्यांच्या प्रश्नावर राष्ट्रपतींचे चोख प्रत्युत्तर; म्हणाल्या,'प्रत्येकाने आपली भाषा...'
17
Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत सरकारचा मसुदा तयार, लवकरच निर्णय!
18
१५ राज्ये, अनेक बँका अन् ओटीपीशिवाय खात्यातून काढले २९ कोटी; ६ आरोपींचे हादरवणारे कृत्य
19
हेमा मालिनी यांनी विकले मुंबईतील दोन आलिशान फ्लॅट्स, १२.५ कोटींची कमाई अन् आता...
20
Raigad Accident: रायगडमध्ये रिक्षाला अपघात, ब्रेक फेल झाल्याने दिशादर्शकाला धडक, तीन ठार

राज्यात बीआरएसने खाते उघडले; ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत पहिला उमेदवार विजयी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2023 18:26 IST

विविध कारणांमुळे रिक्त झालेल्या तालुक्यातील ८ ग्रामपंचायतीच्या ९ सदस्यांच्या जागांसाठी ही पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली होती.

गंगापूर : तालुक्यातील तीन ग्रामपंचायतीसाठी झालेल्या पोटनिवडणुकीचा निकाल शुक्रवारी (दि. १९) जाहीर करण्यात आला. यात अंबेलोहळ येथील ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत बीआरएस (भारत राष्ट्र समिती) पक्षाचा एक उमेदवार विजयी झाल्याने पक्षाने राज्याच्या राजकारणात विजयी प्रवेश केला आहे.

विविध कारणांमुळे रिक्त झालेल्या तालुक्यातील ८ ग्रामपंचायतीच्या ९ सदस्यांच्या जागांसाठी ही पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली होती. यातील गवळीधानोरा, भोयागाव, मलकापूर येथील प्रत्येकी एका जागेसाठीची सदस्यपद निवड बिनविरोध झाली होती. तर वरझडी व नवाबपूर येथे एक देखील अर्ज न आल्याने येथील जागा रिक्त राहणार आहे. तर उर्वरित अंबेलोहळ, जिकठान, मांगेगाव या तीन ग्रामपंचायतींच्या प्रत्येकी एक जागेसाठी गुरुवारी ७५ टक्के मतदान झाले होते. 

यात जिकठान येथून अहेमदखा पठाण हे तर मांगेगाव येथून रुपाली रोडगे व अंबेलोहळ येथून सरदार गफ्फार पठाण हे तीन उमेदवार विजयी झाले. आंबेलोहळ येथील गफ्फार पठाण हे बीआरएस पक्षाचे पदाधिकारी आहे. त्यांच्या रूपाने पक्षाने विजय मिळविला असून पठाण यांच्या विजयानंतर पक्षाच्या कार्यकर्ते व नेत्यांनी जल्लोष केला.

महिनाभरात बीआरएस ४५ हजार गावांत जाणारदरम्यान, आगामी काळात राज्यातील २८८ विधानसभा मतदार संघातील ४५ हजार गावे आणि ५ हजार नगरपालिका, महानगरपालिका क्षेत्रात बीआरएसचे कार्यकर्ते २२ मे ते२२ जून असे महिनाभर घरोघरी फिरतील. प्रत्येक दिवशी किमान पाच गावात जातील. प्रत्येक गावात ते वेगवेगळ्या घटकातील ९ समित्या स्थापन करतील. पुढील महिनाभरात महाराष्ट्रातील प्रत्येक गावात बीआरएस पक्षाचे नाव आणि झेंडा पोहचविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करा, आपले म्हणणे लोकापर्यंत पोहचवा असे आवाहन बीआरएसचे सर्वेसर्वा आणि तेलंगणा मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी आज नांदेड येथील मेळाव्यात केले.

टॅग्स :TelanganaतेलंगणाK Chandrashekar Raoके चंद्रशेखर रावAurangabadऔरंगाबाद