शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

साडूने जेवणासाठी घरी बोलावून केला घात; खून करून मृतदेह फेकला मक्याच्या पिकात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2022 18:59 IST

शेतात मृतदेह टाकून आरोपी काहीच झाले नाहीं असा दिखावा करत कन्नडला दुध विक्रीसाठी गेला होता.

कन्नड ( औरंगाबाद ) : जेवणासाठी घरी बोलावून साडूनेच साडूचा घात केल्याची घटना तालुक्यातील कुंजखेडा येथे घडली. या घटनेमुळे गावात खळबळ उडाली आहे.एजाज खाँ हारुण खाँ पठाण असे मृताचे नाव आहे. दरम्यान, या प्रकरणी तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

महेफुज खाँ महेबुब खाँ पठाण ( २३) व मयत एजाज खाँ हारुण खाँ पठाण ( ३५ ) हे दोघे एकमेकाचे साडू आहेत. रविवारी रात्री महेफुजने एजाज खाँ यास घरी जेवणासाठी निमंत्रण दिले. रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास महेफुजने अज्ञात कारणावरून एजाजच्या डोक्यात लोखंडी दांड्याचा प्रहार करून ठार मारले. त्यानंतर मृतदेह दीडशे फुट फरफटत नेऊन मक्याच्या शेतात टाकला. 

सकाळ झाल्यानंतरही मुलगा एजाज घरी परतला नसल्याने वडील हारुण खाँ उस्मान खाँ पठाण महेफुजच्या घराकडे गेले. येथे त्यांना एजाजची गाडी दिसली. मात्र, त्याचा फोन लागत नसल्याने घराजवळ शोध घेतला. यावेळी मकाच्या शेतात एजाजचा मृतदेह आढळून आला. हारून यांनी याची माहिती ग्रामीण पोलीस ठाण्यात आली. माहिती मिळताच सपोनि टी. आर. भालेराव, पोहेकॉ सतिष खोसरे, कैलास करवंदे, संजय आटोळे, अजय मोतिंगे, पोना बाबासाहेब धनुरे, सुरेश शिंदे, अंमलदार विजय चौधरी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. 

दरम्यान, पोलिसांनी महेफुजला कन्नडवरून घराकडे परतत असताना ताब्यात घेतले. शेतात मृतदेह टाकून आरोपी काहीच झाले नाहीं असा दिखावा करत कन्नडला दुध विक्रीसाठी गेला होता. पोलीसांच्या चौकशीत आरोपी महेफुजने गुन्ह्याची कबुली दिली आहे. मयताचे वडील हारुण खाँ यांच्या फिर्यादीवरून मेह्फुज पठाण, मेहमूद पठाण आणि नशीब पठाण यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 

टॅग्स :Deathमृत्यूAurangabadऔरंगाबाद