शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद महापालिकेत लाचखोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 00:16 IST

विनापरवानगी घराचे बांधकाम करू देण्यासाठी आणि जप्त साहित्य परत करण्याकरिता एका जणाकडून ५० हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी महानगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागप्रमुख आणि कंत्राटी दुय्यम आवेक्षकाला रंगेहात पकडले. ही कारवाई ७ सप्टेंबर रोजी दुपारी महानगरपालिका कार्यालयात झाली.

ठळक मुद्दे५० हजारांची लाच : अतिक्रमण हटाव विभागप्रमुखासह दोन अटकेत

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : विनापरवानगी घराचे बांधकाम करू देण्यासाठी आणि जप्त साहित्य परत करण्याकरिता एका जणाकडून ५० हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी महानगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागप्रमुख आणि कंत्राटी दुय्यम आवेक्षकाला रंगेहात पकडले. ही कारवाई ७ सप्टेंबर रोजी दुपारी महानगरपालिका कार्यालयात झाली.अतिक्रमण विभाग प्रमुख छबूलाल म्हातारजी अभंग (५५) आणि कंत्राटी दुय्यम आवेक्षक सचिन श्रीरंग दुबे (३२), अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. याविषयी अधिक माहिती देताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाºयांनी सांगितले की, तक्रारदारांच्या मुलीचे बीड बायपास परिसरात घराचे बांधकाम सुरू आहे. मनपाची परवानगी न घेता बांधकाम सुरू असल्याचे कळताच अतिक्रमण हटाव पथक विभाग प्रमुख अभंग, आवेक्षक दुबे हे काही दिवसांपूर्वी तेथे गेले. त्यावेळी त्यांनी तातडीने बांधकाम थांबविण्याचे आदेश देत तेथील बांधकाम साहित्य जप्त केले होते. त्यानंतर तक्रारदारांनी अभंग आणि दुबे यांची भेट घेतली आणि बांधकाम सुरू ठेवू द्या, जप्त साहित्य परत करा, अशी विनंती केली. त्यावेळी आरोपींनी तक्रारदारांकडे ७५ हजार रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदारांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली. पोलीस अधीक्षक डॉ. श्रीकांत परोपकारी यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक वर्षाराणी पाटील, नितीन देशमुख, कर्मचारी विजय ब्राह्मंदे, रवींद्र देशमुख, गोपाल बरंडवाल, दिगंबर पाठक , चालक संदीप चिंचोले यांनी दोन पंचांसह तक्रारदारांना आरोपींकडे पाठवून लाचेच्या मागणीची पडताळणी केली. त्यावेळी तडजोडीअंती आरोपी अभंगने ५० हजार रुपयांची लाच आरोपी दुबेकडे देण्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी महानगरपालिका कार्यालय परिसरात दुपारी सापळा रचला. यावेळी अभंग याच्यासाठी आरोपी दुबेने तक्रारदाराकडून लाचेचे ५० हजार रुपये घेतले. आरोपींनी लाच घेताच दबा धरून बसलेल्या पोलिसांनी दोन्ही आरोपींना लाचेच्या रकमेसह रंगेहात पकडले. याप्रकरणी सिटीचौक ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.वर्षभरात दीड हजारांहून अधिक तक्रारीअनधिकृत बांधकाम पाडू नये म्हणून लाच घेणे, तक्रारदाराकडूनही कारवाईसाठी लाच घेण्याचे प्रकार मागील काही वर्षांमध्ये प्रचंड वाढले आहेत. अनधिकृत बांधकामांची संख्या तब्बल ५ हजारांहून अधिक आहे.महापालिकेत गाजलेली लाच प्रकरणे : तत्कालीन मुख्य लेखाधिकारी स्व. महेंद्र खैरनार, कनिष्ठ अभियंता बी.के. गायकवाड, आर.पी. वाघमारे, लिपिक श्रीकांत, सहायक आयुक्त प्रियंका केसरकर यांच्या शिपायाने लाच घेतली होती; मात्र केसरकर यांचा त्याच्याशी संबंध नसल्याचे निष्पन्न झाले होते. अलीकडेच उपायुक्त अय्युब खान, लिपिक लाहोटी यांच्यावरही तसाच आरोप आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMuncipal Corporationनगर पालिकाAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग