आष्टी : येथील तहसील कार्यालयाच्या परिसरात दिवसेंदिवस दलालांचे प्रमाण वाढतच चालले आहे. विविध कागदपत्रे काढण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांसह नागरिकांची आर्थिक लूट करण्याचे काम हे दलाल करीत आहेत. याकडे मात्र तहसीलदार ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे. एकूणच या परिसरात दलालांचा रूबाब वाढत असल्याचे दिसून येत आहे.शैक्षणिक कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी व ग्रामीण भागातील नागरिकांना अत्यावश्यक कागदपत्रे काढण्यासाठी तहसील कार्यालयात यावे लागते. जात प्रमाणपत्र, धरणग्रस्त, रहिवासी प्रमाणपत्र अशी विविध प्रकारची कागदपत्रे काढण्यासाठी तर नवीन रेशनकार्ड, निराधार योजनेचे प्रमाणपत्र काढण्यासाठी कार्यालयाच्या परिसरात विद्यार्थी व नागरिकांच्या नेहमीच रांगा लागलेल्या असतात.येथे आल्यानंतर त्यांना थेट ना तहसीलदारांना भेटून दिले जाते ना सेतू मधील कर्मचाऱ्यांना. माणूस दिसला की, हे दलाल त्याचा पाठलाग करीत त्याला जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करतात. सर्वसामान्य नागरिकांनी प्रमाणपत्र काढण्यासाठी आवश्यक त्या कागदात्रांची पूर्तता केली तरी संबंधित अधिकाऱ्यांकडूनही नियमावलीवर बोट ठेवीत जागोजागी अडवणूक केली जाते. दलालांकडून कोणत्याही कागदपत्रांची पुर्तता न करता घरपोच प्रमाणपत्र आणून दिले जात असल्याचा प्रकारही येथील तहसील कार्यालयामध्ये दिसून येतो़संपूर्ण कागदपत्रांची पूर्तता करूनही सेतू कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून दुर्लक्ष केले जाते़ संबंधित काम हे दलालाकडूनच करून घेण्यात कर्मचाऱ्यांचा अर्थपूर्ण दृष्टीकोन असल्याच्या आरोप सर्वसामान्यांमधून होत आहे. सेतू कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या दुटप्पी भूमिकेमुळे नागरिकांना प्रमाणपत्रासाठी अतिरीक्त पैशाचा फटका सहन करावा लागत आहे. तहसील कार्यालयातील दिवसेंदिवस दलालांचा वाढते प्रमाण पाहता त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी वेळोवेळी संघटनांनी केली. मात्र आर्थिक हीत जोपासत तहसीलदार यांनीही अद्यापर्यंत कठोर पाऊल उचलले नाही. त्यामुळे दलालांना तहसील कार्यालयातूनच अभय मिळत असल्याचा आरोप होत आहे़यासंबधी तहसीलदार राजीव शिंदे यांना विचारणा केली असता, अशा दलालांवर कारवाई येईल, असे सांगितले़ तहसीलदारांकडूनच पाठराखवणतहसीलच्या आवारात ५० ते ६० दलाल नियमित बसलेले असतात़ या दलालांमार्फत आलेल्या कागदपत्रांवर स्वाक्षरी करण्यास तहसीलदार अधिक पसंती देत असल्याचा आरोपही येथील नागरिकांनी केला आहे़सेतूमध्येही बिनधास्त परवानगीयेथील सेतू कार्यालयात बाहेर बसलेले दलाल बिनधास्तपणे वावरताना दिसतात़ येथे असणाऱ्या महत्वाच्या कागदपत्रांची तपासणीही हेच करत असल्याचे समोर आले आहे़ याला मात्र सेतू कार्यालयातील कर्मचारी दुजोरा देतात़ (वार्ताहर)
तहसीलमध्ये दलालांचा रुबाब
By admin | Updated: September 22, 2014 00:55 IST