शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मुलं म्हणाले, घर आमच्या नावावर करा व तुम्ही दोघे वृद्धाश्रमात जा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 23:17 IST

औरंगाबाद : संपत्ती पुढे सर्वच नाती मातीमोल ठरत आहेत. देवाच्या रुपात ज्यांना पाहिले जाते, असे तीर्थरूप आई-वडील घर आपल्या ...

ठळक मुद्देवृद्ध वडिलांनी गाठले पोलीस ठाणे, नोंदविली तक्रार

औरंगाबाद : संपत्ती पुढे सर्वच नाती मातीमोल ठरत आहेत. देवाच्या रुपात ज्यांना पाहिले जाते, असे तीर्थरूप आई-वडील घर आपल्या नावावर करीत नाहीत म्हणून त्यांचा छळ पोटची दोन मुले व सुनांकडून सुरू होता. त्यामुळे हतबल झालेल्या वृद्ध आई-वडिलांना पोलिसात धाव घेऊन तक्रार नोंदवावी लागल्याची लाजिरवाणी घटना सिडकोत २९ नोव्हेंबर रोजी घडली.वृद्ध आई-वडिलांचा सांभाळ करणे मुलांना कायद्याने बंधनकारक केले आहे; परंतु ही जबाबदारी तर सोडाच घर नावे करून द्यावे, पेन्शनचे पैसेही द्यावेत यासाठी मुले आणि सुनांनी वृद्ध आई-बाबांना त्रास देऊन घराबाहेर हाकलून दिले होते. मुले विनोद अमृतराव फतपुरे, धीरज अमृतराव फतपुरे आणि दोन सुनांचा आरोपींत समावेश आहे. सिडको पोलिसांनी सांगितले की, सिडको एन-७ मधील गेडोर कॉलनीमध्ये अमृतराव धनसिंग फतपुरे (६५) हे पत्नी आणि दोन मुले, सुना यांच्यासह राहतात. त्यांना विनोद आणि धीरज ही दोन विवाहित मुले आहेत. त्यांची मुले आणि सुना त्यांना त्यांच्या नावे घर करण्यासाठी दबाव टाकीत आहे. घरखर्चासाठी वृद्ध आई-वडिलांकडून त्यांच्या पेन्शनची रक्कमही ते घेतात. पैसे दिले नाही तर अपमानास्पद बोलतात. मुलांच्या नावे घर केल्यानंतर आपला मुक्काम वृद्धाश्रमात हलविण्याचे मुलांचे इरादे पाहून वडील अमृतरावांनी मुलांच्या नावे घर करणे टाळलेच.वडील घर नावावर करीत नाहीत हे पाहून मग, धीरजने दुसरी युक्ती लढवून घर बांधण्यासाठी सासुरवाडीकडून आणलेले तीन लाख रुपये परत देण्यासाठी घरात भांडण-तंटे सुरू केले. काहीही करून आई-वडिलांनी वृद्धाश्रमात राहण्यासाठी जावे, यासाठी धीरज त्यांना शिवीगाळ करून त्रास देतो. वडील बधत नाहीत, हे पाहिल्यावर दोन्ही मुलांनी त्यांना जिवे मारण्याची धमकी देत घराबाहेर हाकलून देत बेघर केले.चौकटआई-वडिलांचा सांभाळ करणे बंधनकारककायद्यानुसार वृद्ध आई-वडिलांचा सांभाळ करणे मुलांना बंधनकारक आहे. परंतु मुलांनीच बेघर केल्याने अमृतराव यांनी विनोद आणि धीरज तसेच त्यांच्या पत्नींविरोधात सिडको ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी गुन्हा नोंदविला असून सहायक उपनिरीक्षक पठाण तपास करीत आहेत्

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसAurangabadऔरंगाबाद