शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

Video: देवेंद्र फडणवीसांच्या समोर खोक्यांची पळवापळवी; गंगापूरमध्ये कार्यक्रमात गोंधळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2024 15:32 IST

आरोग्य, कामगार आणि खेळाडूसाठीच्या वेगेवेगळ्या किटची पळवापळावी सुरू झाल्याने एकच गोंधळ उडाला

छत्रपती संभाजीनगर: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गंगापुर तालुक्यात विकास कामांचे उद्घाटनाकहा कार्यक्रम आमदार प्रशांत बंब यांनी आयोजित केला होता.मात्र, उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे भाषण सुरू असताना काही नागरिकांनी कामगार कल्याण किटची पळवापळवी केल्याने एकच गोंधळ उडाला. यामुळे येथे फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन होणाऱ्या विकास कामांचा कार्यक्रम बाजूला राहून लाभार्थी किटची पळवापळावीचीच चर्चाच सुरू झाली. 

गंगापूर तालुक्यातील सुलतानाबाद आरापुर शिवारात गंगापूर उपसा जलसिंचन योजना १'चे उद्घाटन आज दुपारी एक वाजता मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नागरिकांना किट देण्याचे नियोजन होते. मात्र, उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे भाषण सुरू असताना काही नागरिकांनी पत्रे उचकटून कामगार कल्याण किटचे खोके आणि पेट्या पळवल्या. यामुळे एकच गोंधळ उडाला.

नियोजनानुसार फडणवीस यांच्या हस्ते कामगार कल्याण किटचे वाटप होणार होते. त्यासाठी लाभार्थी यांना टोकन देखील देण्यात आले होते. मात्र अचानक काही नागरिकांनी किट पळविल्या. आरोग्य, कामगार आणि खेळाडूसाठीच्या वेगेवेगळ्या किटची पळवापळावी सुरू होताच नागरिकांनी गर्दी केली. हाती येईल त्या किट घेऊन नागरिकांनी तेथून पळ काढला.

ते तर पाठीत खंजीर खुपसणारे दरम्यान, यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, मागील अडीच वर्षांच्या काळातील सरकारने जलयुक्त शिवारच्या पाठीत खंजीर खुपसला,मराठवाडा वाटर ग्रीडच्या पाठीत खंजीर खुपसला,समृद्धी महामार्गाच्या पाठीत खंजीर खुपसला. यासह प्रत्येकाच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम आधीच्या सरकारने केले. मी मुख्यमंत्री असतो तर हे केले असते ते केले असते असे राज्यात एक व्यक्ती रोज सांगतो. मात्र अडीच वर्ष तुम्हाला मुख्यमंत्री केले तेव्हा आपण घरात बसून होता. आताही तुम्ही घरी बसून निंबध लिहा अशी बोचरी टीका उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता फडणवीस यांनी केली यावेळी केली. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस