शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

Video:'नतमस्तक होऊन माफी मागतो'; विनायक राऊतांची ब्राम्हण समाजाकडे 'त्या' विधानावरून माफी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2022 19:04 IST

राज्याचे विधान परिषद विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना जनाब संबोधल्याने भाजप आणि शिवसेनेत वाद निर्माण झाला आहे.

औरंगाबाद: शिवसेनेचे हिंदुत्व हे शेंडी, जाणव्यातील नसून ते व्यापक आहे, या शिवसेना सचिव खा. विनायक राऊत यांच्या विधानावरून वादंग उठले होते. ब्राम्हण समन्वय समितीने या विधानावर नाराजी व्यक्त करत थेट मातोश्रीवर आंदोलनाचा इशारा दिला होता. आज विनायक राऊत यांनी या विधानावर जाहीर मागितली आहे. ' नतमस्तक होऊन माफी मागतो' अशा शब्दात त्यांनी ब्राम्हण समाजाची माफी मागितली. 

राज्याचे विधान परिषद विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना जनाब संबोधल्याने भाजप आणि शिवसेनेत वाद निर्माण झाला आहे. शिवसंपर्क अभियानासाठी शहरात आलेल्या शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी या विधानाचा समाचार घेताना, मुस्लिमांच्या मतांसाठी भाजपने हिंदुत्व गुंडाळून ठेवले आहे. यापुढे भाजपसोबत शिवसेनेची युती कधीही होणार नाही. यापुढे महाविकास आघाडीचे सरकार असेल, असे स्पष्ट केले. तसेच शिवसेनेचे हिंदुत्व हे शेंडी, जाणव्यातील नसून ते व्यापक आहे,असा हल्लाबोल केला होता. 

मात्र, 'शेंडी आणि जाणवे' या विधानावर ब्राम्हण समन्वय समितीने आक्षेप घेऊन पत्रकार परिषदे घेऊन आंदोलनाचा इशारा दिला होता. राऊत यांनी आठ दिवसात माफी मागावी नसता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी आंदोलन करण्यात येईल असे म्हटले होते. वाढती टीका लक्षात घेता आज खा. राऊत यांनी यावर माफी मागितली. 'नतमस्तक होऊन माफी मागतो' या शब्दात खा. राऊत यांनी ब्राम्हण समाजाची माफी मागत या प्रकरणावर पडदा टाकला आहे. 

काय म्हणाले होते खा. विनायक राऊत जनतेने शिवसेनाप्रमुख ठाकरे यांना हिंदुहृदयसम्राट ही उपाधी दिली आहे. दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांनी देखील त्यांच्या हिंदुत्व विचारांचे अनुकरण केले. मात्र फडणवीसांनी त्यांना जनाब असा उल्लेख करून अक्षम्य पाप केले आहे. शिवसेनेने हिंदुत्व सोडले नाही, मात्र फडणवीसांसह भाजपाने मुस्लिमांच्या मतांसाठी हिंदुत्व गुंडाळून ठेवले आहे. शिवसेनेचे हिंदुत्व हे शेंडी, जाणव्यातील नसून ते व्यापक आहे. यापुढे भाजपसोबत शिवसेनेची युती कधीही होणार नाही. यापुढे महाविकास आघाडीचे सरकार असेल.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादVinayak Rautविनायक राऊत Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस