शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
4
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
5
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
6
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
7
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
8
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
9
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
10
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
11
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
12
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
13
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
14
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
15
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
16
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
17
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
18
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
19
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
20
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'

स्मशानजोग्यांनी केली उधार उसणवारी; कोरोना काळातील अंत्यविधींचे पैसे महापालिकेने थकविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 13:44 IST

Aurangabad municipality News : कोरोना काळात मृतदेहांवर केलेल्या अंत्यसंस्काराचे पैसे मिळत नसल्याने स्मशानजोगींनी पालिकेत येऊन संताप केला.

ठळक मुद्देचार महिन्यांपासून स्मशानजोगी वेतनाविनाचसंस्था आणि स्मशानजोगी फ्रंटवर्कर

औरंगाबाद : दीड वर्षांत कोरोना संसर्गाने मृत्युमुखी पडलेल्या सुमारे दोन हजार मृतदेहांवर महापालिकेतर्फे अंत्यसंस्कार करण्यात आले. यासाठी स्मशानजोग्यांनी तब्बल ५० लाख रुपयांची उधार, उसणवारी करून सरणाची लाकडे आणली. या सरणाचा खर्च व स्मशानजोगींचे चार महिन्यांचे वेतनही मनपाने थकविले आहे. ( Corona-era funeral rites cost money pending towards the Aurangabad municipality ) 

मनपा एका मोफत अंत्यसंस्कारासाठी लाकडांचा खर्च म्हणून स्मशानजोगींना अडीच हजार रुपये देते. मात्र ही रक्कम वेळेत मिळत नसल्याने स्मशानाजोगी त्रस्त आहेत. कोरोना काळात मृतदेहांवर केलेल्या अंत्यसंस्काराचे पैसे मिळत नसल्याने स्मशानजोगींनी पालिकेत येऊन संताप केला. पुष्पनगरी स्मशानभूमीचे स्मशानजोगी गोविंद गायकवाड यांनी सांगितले की, चार महिन्यांतील लाकडाचे पैसे आणि वेतन नसल्यामुळे आम्ही आर्थिक अडचणीत सापडलो आहोत. पुष्पनगरी स्मशानभूमीत एका हजारांपेक्षा अधिक मृतदेहांवर चार महिन्यात अंत्यसंस्कार करण्यात आले. एकट्या पुष्पनगरी स्मशानभूमीचे सरणाचे २५ लाख रुपये थकले आहेत.

संस्था आणि स्मशानजोगी फ्रंटवर्करकोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत शहरात दोन हजारांपेक्षा अधिक नागरिकांचा कोरोना संसर्गाने मृत्यू झाला. पालिकेने नेमलेल्या स्वयंसेवी संस्था, स्मशानजोग्यांनी मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले. अनेकदा नातेवाईक अंत्यसंस्काराला येत नसत, त्या परिस्थितीत संस्था आणि स्मशानजोगींनी शहरातील ४० स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले. मुकुंदवाडी, पुष्पनगरी, सेंट्रल नाका, प्रतापनगर, बेगमपुरा, आंबेडकरनगर आणि कैलासनगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. याशिवाय पाच दफनभूमीतही अंत्यसंस्कार करण्यात आले.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाAurangabadऔरंगाबादcorona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यू