शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

जन्मदात्याने कालविले भाकरीच्या पिठात विष, तीन मुलांचा मृत्यू; पत्नी अत्यवस्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 05:51 IST

सोयगाव (जि. औरंगाबाद) : शेतक-याने स्वत:च्या घरातील भाकरीच्या पिठात विष कालवल्याने त्याच्या तीन मुलांचा मृत्यू झाला असून त्याच्या पत्नीची मृत्यूशी झुंज सुरू आहे.

सोयगाव (जि. औरंगाबाद) : शेतक-याने स्वत:च्या घरातील भाकरीच्या पिठात विष कालवल्याने त्याच्या तीन मुलांचा मृत्यू झाला असून त्याच्या पत्नीची मृत्यूशी झुंज सुरू आहे. न्हावी तांडा येथे सोमवारी रात्री हा प्रकार घडला. घरातील ताणतणाव किंवा आर्थिक चणचणीतून शेतकºयाने कुटुंब संपविण्याचा प्रयत्न केला असावा, अशी चर्चा गावात आहे.पिठात विष कालवल्यानंतर फरार झालेल्या राजू रतन राठोड यास बुधवारी दुपारी सोयगाव पोलिसांनी ताब्यात घेतले. तो काहीही बोलत नसल्याने व याप्रकरणी कुणीही तक्रार न दिल्याने सोयगाव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. राजू हा पत्नी कावेरीबाई (३२), मुलगी ज्योती (१३), गोगली (८) व मुलगा राहुल (१०) यांच्यासह राहत होता. पत्नी शेतातून येण्याच्या आधी सोमवारी सायंकाळी त्याने घर गाठले. डब्यातील ज्वारीच्या पिठात विष कालवले. कावेरीबाई यांनी नेहमीप्रमाणे स्वयंपाक केला. संपूर्ण कुटुंबाने व शेजारील दिनेश राठोडनेही त्यांच्याकडेच जेवण केले. मात्र राजू हा नंतर जेवतो म्हणून घरातून गेला तो परत आलाच नाही. मध्यरात्री पाचही जणांना उलट्या होऊ लागल्याने त्यांना नातेवाईकांनी तातडीने पिंपळगाव हरेश्वर (ता. पाचोरा, जि. जळगाव) येथील खासगी रुग्णालयात दाखल केले.प्रकृती चिंताजनक झाल्याने सर्वांना जळगावचे सामान्य रुग्णालय व खासगी रुग्णालयात दाखल केले. ज्योती व गोगली यांचा मंगळवारी रात्री मृत्यू झाला, तर बुधवारी रात्री राहुल याचाही मृत्यू झाला. कावेरीबाई व दिनेश मृत्यूशी झुंज देत आहेत.>कारण अस्पष्टजळगाव येथील जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करुन हे प्रकरण सोयगाव पोलिसांकडे वर्ग करण्यात आले. त्यानुसार बुधवारी धिंगापूर धरणाजवळ लपून बसलेल्या राजू यास पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याने पिठात विष का कालवले, याचे कारण स्पष्ट झाले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. रात्री उशिरापर्यंत कुणीही फिर्याद दिली नसल्याने आम्ही अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल केला आहे, असे सोयगावचे सहायक पोलीस निरीक्षक सुजित बडे यांनी सांगितले.

टॅग्स :Farmerशेतकरीfarmer suicideशेतकरी आत्महत्याDeathमृत्यू