शहरं
Join us  
Trending Stories
1
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
2
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
3
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
4
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
5
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
6
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
7
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
8
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
9
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
10
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
11
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
12
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
13
महामुंबईसाठी पद्मश्री पुरस्कार विजेत्यांचा जाहीरनामा
14
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
15
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
16
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
17
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
18
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
19
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
20
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा

मालमत्ता खरेदीत येणार बूम; औरंगाबादमध्येही मिळणार मुद्रांक शुल्कात सवलत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2020 19:45 IST

. या सवलतीमुळे नागरिक पुढे येतील.

ठळक मुद्देशहरात ३ टक्के, तर ग्रामीण भागात दोन ते अडीच टक्के शक्य स्टॅम्प ड्यूटी भरण्याअभावी अनेक व्यवहार थांबलेले आहेत.

औरंगाबाद : जिल्ह्यातही मालमत्ता खरेदी करताना मुद्रांक शुल्कात शहरात ३ टक्के, तर  ग्रामीण भागात २ ते अडीच टक्के सवलत १ सप्टेंबरपासून मिळण्याची शक्यता आहे. सध्या सहा टक्के रजिस्ट्री खर्च येतो. फ्लॅट, घर, जमीन याबाबत ही सवलत कशासाठी असेल याचे वर्गीकरण अजून आलेले नाही. १० लाखांच्या मालमत्तेसाठी ६० हजार रुपये सध्या लागतात. ३ टक्क्यांनी ३० हजार रुपये लागतील. ३० हजार रुपयांची रक्कम मुद्रांक व्यवहारात वाचेल. गॅझेट (राजपत्र) आल्यानंतरच हा निर्णय अमलात येईल. 

स्टॅम्प ड्यूटी भरण्याअभावी अनेक व्यवहार थांबलेले आहेत. या सवलतीमुळे नागरिक पुढे येतील. मनपा हद्दीत सध्या ५ अधिक १, अशी सहा टक्के शेकडा रक्कम स्टॅम्प ड्यूटी आहे. ग्रामीण भागात ४ अधिक १ अशी ५ टक्के सध्या स्टॅम्प ड्यूटी आहे. सहा टक्क्यांवरून तीन टक्के आणि पाचवरून दोन ते अडीच टक्के दर होईल. डिसेंबर २०२० नंतर यामध्ये आणखी सवलत मिळण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

मालमत्ता खरेदीत वाढ होईलमालमत्ता खरेदीत वाढ होणे शक्य आहे. कारण सध्या २५ लाखांचा फ्लॅट खरेदी केला तर दीड लाखांच्या आसपास रजिस्ट्रीचा खर्च येतो. ३ टक्क्यांनी रजिस्ट्री खरेदी-विक्रीचा व्यवहार झाला तर ७५ हजार रुपयांत व्यवहार होईल. यामुळे मालमत्ता खरेदीत मोठी बूम होणे शक्य आहे. ग्रामीण भागातील व्यवहारांवरदेखील याचा फरक पडणे शक्य होणार आहे. लॉकडाऊनमुळे अर्थकारणाची ठप्प पडलेली गाडी पुन्हा रुळावर आणण्यासाठी नागरिकांना सवलत देण्याचा सरकारचा निर्णय आहे.

औरंगाबादचे उद्दिष्ट  ४०० कोटीमुद्रांक शुल्कातून औरंगाबादला या वर्षाचे उद्दिष्ट  ४०० कोटी आहे. लॉकडाऊनमुळे सगळे व्यवहार ठप्प झाले होते. त्यांना दोन महिन्यांपूर्वी हळूहळू चालना मिळाली. खरेदी-विक्री व्यहारातील स्टॅम्प ड्यूटीतून आजवर ४५ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. किमान २०० कोटींपर्यंत हा महसूल आजवर होणे आवश्यक होते. गेल्यावर्षी ३९९ कोटींचा महसूल मिळाला आहे. महसुलाचे प्रमाण कमी  झाल्यामुळे शासनाने मुद्रांक शुल्कात सवलत देण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. मुंबई, पुण्यासारख्या शहरातही खरेदी-विक्रीचे व्यवहार कमी होत आहेत.  शासनाला सवलतीनंतर महसुलात भर पडण्याची अपेक्षा आहे. 

मुद्रांक अधिकाऱ्यांची माहितीजिल्हा मुद्रांक अधिकारी दीपक सोनवणे यांनी सांगितले, १ सप्टेंबरपासून हा निर्णय लागू होणे शक्य आहे. त्याबाबत अद्याप आम्हाला काहीही सूचना नाहीत. गॅझेटमध्ये याबाबत झालेला निर्णय प्रकाशित होईल. सर्व विभागांना गॅझेट येईल, त्यानंतर सर्व काही स्पष्ट होईल. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादTaxकर