शहरं
Join us  
Trending Stories
1
जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
दुबार मतदार दिसताच बडवा; मविआ-मनसेचा महाएल्गार! मतदार यादीतील घोळाबाबत मुंबईत निषेध मोर्चा
3
गाव पोटा.. व्यवसाय शेती अन् वालेगावकर दाम्पत्याला मिळाला उपमुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान
4
‘तुमच्या विमानात आज १९८४ मद्रास स्टाईल बॉम्ब अटॅक होणार आहे’; मुंबईत इमर्जन्सी लँडिंग
5
२४ मोबाईल खेचणाऱ्या दोन आरोपींना अटक; आचोळेच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांची कामगिरी
6
IND vs SA Women's World Cup 2025 Final Live Streaming: फायनलमध्ये 'ही' गोष्ट ठरेल भारतासाठी जमेची बाजू
7
ठेकेदारांचे कामबंद, हिवाळी अधिवेशन नागपूर की मुंबईत? बांधकाम खाते संभ्रमात
8
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
9
IND vs AUS 3rd T20I Live Streaming : हा सामना जिंका नाहीतर मालिका विसरा! टीम इंडियाकडे शेवटची संधी
10
निर्भिड आणि बेधडक पत्रकारितेची आज गरज; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मत
11
Pune Crime: नाशिकच्या तरुणीवर हिंजवडीत कोयत्याने हल्ला! प्रेमप्रकरणातून तरुणाने केला जीव घेण्याचा प्रयत्न
12
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
13
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
14
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
15
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
16
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
17
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
18
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
19
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
20
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले

अमेरिकन नागरिकांना फसविणारे बोगस कॉल सेंटर; आरोपींच्या चार मजली इमारतीची झाडाझडती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2025 12:51 IST

दहापेक्षा अधिक लॅपटॉप, क्रेडिट कार्डसह घोटाळ्यासंदर्भात कागदपत्रे जप्त

छत्रपती संभाजीनगर : विदेशी नागरिकांना विविध प्रकारे जाळ्यात अडकवून कोट्यवधी रुपयांचा ऑनलाइन गंडा घालणाऱ्या कॉल सेंटरच्या चालक व कर्मचाऱ्यांच्या चार मजली इमारतीची पोलिसांनी शुक्रवारी कसून तपासणी केली. जवळपास तीन तास चाललेल्या झाडाझडतीत दहापेक्षा अधिक लॅपटॉप, क्रेडिट कार्ड व घोटाळ्यासाठी वापरल्या जाणाऱ्या अनेक राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील बनावट शासकीय कागदपत्रांचे गठ्ठे सापडल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

२८ ऑक्टोबर रोजी चिकलठाणा औद्योगिक वसाहतीमधील आयटी पार्कमध्ये आयआरएस इंटरनल रेव्हेन्यू सर्व्हिस इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट नावाच्या सायबर गुन्हेगारांचे कॉल सेंटर उघडकीस आले. शहरातून विदेशातील नागरिकांना त्यांच्या कर व बँक व्यवहारांच्या माहितीच्या आधारे कोट्यवधी रुपयांना गंडा घातला जात होता. यात आतापर्यंत भावेश प्रकाश चौधरी (३४), भाविक शिवदेव पटेल (२७), सतीश शंकर लाडे (३५), वलय पराग व्यास (३३), (सर्व रा. अहमदाबाद, गुजरात), अजय ठाकूर आणि मनवर्धन राठोडसह रॅकेटचा महाराष्ट्रातील मास्टरमाइंड अब्दुल फारुक मुकदम शाह ऊर्फ फारुकी याला अटक करण्यात आली. शुक्रवारी या सर्वांना एकमेकांसमोर बसवून पोलिस उपायुक्त प्रशांत स्वामी, निरीक्षक गीता बागवडे यांनी कसून चौकशी केली.

सिंधी कॉलनीतील बंगला क्र. ५६सहा प्रमुख आरोपींसह ११४ कर्मचाऱ्यांसाठी फारुकने सिंधी कॉलनीतील बंगला क्र. ५६ किरायाने घेतला होता. सर्व आरोपींची राहण्याची तेथे व्यवस्था होती. तरुण-तरुणी एकत्र राहत होते. मात्र, त्यांना दिवसभर बाहेर कुठेही जाण्याची अनुमती नव्हती. शिवाय, पगाराव्यतिरिक्त त्यांचा सर्व खर्च फारुक करत होता. पोलिसांनी शुकवारी दुपारी तीन तास या इमारतीची झाडाझडती घेतली. त्यात अनेक विदेशी कागदपत्रे हाती लागली. पोलिस महासंचालक कार्यालयामार्फत त्यांची पडताळणी करण्यात येणार आहे. अटकेतील सात आरोपींच्या चौकशीनंतर सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या काही आरोपींना पुन्हा ताब्यात घेऊन रॅकेट कसे चालायचे, त्यांना प्रशिक्षण कोणी दिले इ. माहिती घेतली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Bogus call center duped Americans; Four-story building searched, evidence seized.

Web Summary : A fake call center defrauding Americans was raided. Police seized laptops, credit cards, and forged documents. The operation, run from a four-story building, involved multiple arrests and a sophisticated scam targeting US citizens with tax and banking information.
टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरCrime Newsगुन्हेगारीUSअमेरिका