छत्रपती संभाजीनगर :परभणी येथे संविधान प्रतिकृतीचा अवमान झाल्याचा प्रकार समोर आला होता. याच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या बंदला हिंसक वळण लागले. दरम्यान आता या दगडफेक प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या एका तरुणाचा मृत्यू झाला. तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनसाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आला.
परभणी आंदोलनातील आरोपीचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू
सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी (३६, रा. भोसरी, जि. पुणे, ह.मु.शंकर नगर, परभणी) असे मयत तरुणाचे नाव आहे. घाटीत शवविच्छेदनगृह परिसरात आंबेडकरी चळवळीतील नेते, पदाधिकारी यांच्यासह युवकांनी मोठी गर्दी केली आहे. परिसरात सध्या मोठा पोलिस बंदोबस्त आहे.