शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
2
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
3
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
4
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
5
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
6
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
7
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
8
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
9
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
10
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
11
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
12
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
13
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
14
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
15
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
16
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
17
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
18
"५ सेकंद सर्व थांबले, हिरवी लाईट सुरु झाली अन्..."; रमेश विश्वासकुमारने सांगितले टेकऑफ नंतर काय घडलं
19
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?
20
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख

मोमबत्ता तलावातील नौकाविहारचा मुहूर्त टळला; आचारसंहितेपूर्वी सुरू होईल का?

By विजय सरवदे | Updated: January 31, 2024 15:35 IST

पालकमंत्री संदीपान भुमरे आणि आमदार संजय शिरसाट यांची वेळ जुळली नसल्यामुळे प्रजासत्ताकदिनी नौकाविहाराचा प्रारंभ टळल्याची कुजबुज

छत्रपती संभाजीनगर : बहुप्रतीक्षित मोमबत्ता तलावात नौकाविहार सुरू होण्याचा २६ जानेवारीचा मुहूर्त टळल्यामुळे नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा आहे. दरम्यान, पालकमंत्री संदीपान भुमरे आणि आमदार संजय शिरसाट यांची वेळ जुळली नसल्यामुळे प्रजासत्ताकदिनी नौकाविहाराचा प्रारंभ टळल्याची कुजबुज आहे.

दौलताबाद किल्ल्याजवळ निसर्गरम्य ठिकाणी मोमबत्ता तलावात नौकाविहारचा आनंद पर्यटक व नागरिकांना घेता यावा, यासाठी मागील ८-१० वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या अनेक तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी प्रयत्न केले. अखेर विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीणा यांच्या प्रयत्नाला यश आले. सन २०१६-१७ मध्ये या प्रकल्पासाठी शासनाने सव्वा कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. त्यातून ६३ लाख रुपये खर्च करून जि.प. प्रशासनाने तिकीटघर, बोटिंगतळ, वाहनतळ, कॅन्टीनची उभारणी केली होती. अलीकडेच दौलताबाद, वेरुळ, म्हैसमाळ, सुलीभंजन, खुलताबाद येथील ग्रामीण पर्यटनाला चालना मिळावी, या हेतूने तेथील पायाभूत सुविधा व परिसर विकासासाठी जिल्हा परिषदेने ३३ कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला होता. त्यापैकी दौलताबादजवळील मोमबत्ता तलाव परिसर विकासासाठी शासनाने १० कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. यापैकी साडेचार कोटींचा प्रस्ताव मंजूर झाला आहे. त्यानंतर, जिल्हा परिषदेने बोटिंगसाठी निविदा प्रसिद्ध केली. त्यानुसार, महाराणा एजन्सी सिक्युरिटी अँड लेबर सप्लायर्स या संस्थेला हे कंत्राट निश्चित झाले. नौकाविहाराची तयारी पूर्ण झाली असली, तरी आचारसंहिता लागू होण्यापूर्वी नौकाविहार सुरू व्हावी, अशी अपेक्षा हौशी नागरिकांनी व्यक्त केली आहे.

भुमरे - शिरसाटांची वेळ हवीपालकमंत्री भुमरे व आमदार संजय शिरसाट यांनी जिल्हा परिषदेने सादर केलेला ग्रामीण पर्यटनाचा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी शासनाकडे जोर लावला होता. त्यामुळे या दोघांच्या हस्ते नौकाविहाराचे उद्घाटन व्हावे, अशी प्रशासनाची अपेक्षा आहे. मात्र, कार्यबाहुल्यामुळे त्या दोघांच्या वेळेचा ताळमेळ लागत नाही. लवकरच नौकाविहाराचे उद्घाटन होण्यासाठी दौलताबाद ग्रामपंचायत आणि संबंधित कंत्राटदार संस्था प्रयत्नशील असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद