निराला बाजार चौकात सांडपाणी रस्त्यावर
औरंगाबाद : निराला बाजार चौकातील रस्त्यावर गेल्या काही दिवसांपासून रस्त्यावर पाणी वाहत आहे. त्यामुळे पादचारी, वाहनचालकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. याकडे मनपाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
स्ट्रेचर मिळण्यासाठी प्रतीक्षा करण्याची वेळ
औरंगाबाद : घाटीतील अपघात विभागात स्ट्रेचर, व्हीलचेअर अपुरे पडत आहेत. रुग्ण वाॅर्डात दाखल झाल्यानंतरच अन्य रुग्णास स्ट्रेचर मिळत असल्याची स्थिती आहे. त्यामुळे येथे स्ट्रेचर, व्हीलचेअरची संख्या वाढविण्याची मागणी होत आहे.
शरदाश्रम कॉलनीत खड्डेमय रस्ते
औरंगाबाद : शरदाश्रम कॉलनीतील रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. या भागातून ये-जा करणाऱ्या वाहनांची संख्या अधिक आहे. खड्डेमय रस्त्याचा वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. खड्डे तात्काळ बुजविण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
रुग्णवाहिकेसाठी कर्मचारी देण्याकडे घाटीत दुर्लक्ष
औरंगाबाद : घाटीतील अपघात विभागातून मेडिसिन विभागात रुग्ण दाखल करण्यासाठी रुग्णवाहिकेची सुविधा दिली जाते; परंतु चालकाशिवाय इतर कोणीही कर्मचारी सोबत राहत नसल्याने गंभीर रुग्णांना नातेवाईकांच रुग्णवाहिकेत बसविण्याची कसरत करावी लागते. एकच नातेवाईक असेल तर अधिक मनस्ताप होतो.