शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नेत्रहीन वृत्तपत्र विक्रेते शेख नाहीद यांच्या जिद्दीचे ‘लोकमत’मध्ये कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2019 02:29 IST

आज त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह याच्यावरच चालतो.

औरंगाबाद : जागतिक दिव्यांग दिनानिमित्त औरंगाबादेतील नेत्रहीन वृत्तपत्र विक्रेते व एजंट शेख नाहीद यांचा लोकमत समूहाचे एडिटर-इन-चीफ राजेंद्र दर्डा यांनी लोकमत कार्यालयात मंगळवारी सत्कार केला. यावेळी नाहीद यांच्या जिद्दीची दर्डा यांनी प्रशंसा केली.नेत्रहीन असूनही दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर स्वत:च्या पायावर उभे राहत शेख नाहीद हे औरंगाबादेत वृत्तपत्र विक्रेत्याचे काम करीत आहेत. जन्मत: त्यांना एका डोळ्याने काहीच दिसत नव्हते, तर दुसऱ्या डोळ्याने फार कमी दिसत होते. दुसºया डोळ्याची शस्त्रक्रियाही करण्यात आली; परंतु झाले उलटेच. दुसºया डोळ्यानेही काहीच दिसेनासे झाले. मात्र, याही स्थितीत त्यांनी जिद्द सोडली नाही व ते वृत्तपत्र विक्रेता झाले.आज त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह याच्यावरच चालतो. औरंगाबादेतील एन-७ सिडको भागातील वृत्तपत्र वितरण केंद्रावर शेख नाहीद दररोज पहाटेच जातात. यासाठी त्यांना जवळपास राहणारे कोणीही मदत करतात. तेथून वृत्तपत्रे घेऊन ते आझाद चौकाजवळील रहेमानिया चौकातील आपल्या जागेवर परततात व तेथेच विक्री करतात.काही तासांमध्ये वृत्तपत्रांची विक्री करून ते घरी परततात. नेत्रहीन असूनही ते हिशोबाचे पक्के आहेत. शेख नाहीद यांच्या जिद्दीचे ‘लोकमत’मध्ये कौतुक करण्यात आले.या सत्कारावेळी ‘लोकमत समाचार’चे कार्यकारी संपादक अमिताभ श्रीवास्तव, ‘लोकमत टाइम्स’चे निवासी संपादक योगेश गोले, ‘लोकमत’चे निवासी संपादक प्रेमदास राठोड, वरिष्ठ महाव्यवस्थापक प्रवीण चोपडा, महाव्यवस्थापक (जनसंपर्क) डॉ. खुशालचंद बाहेती, व्यवस्थापक (प्रसार) प्रमोद मुसळे, उपव्यवस्थापक (जाहिरात) सूरज धाये, प्रसार विभागाचे शेख इश्तियाख व मंगेश कुमठे उपस्थित होते.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद