शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

गुप्तधनासाठी नरबळीचा डाव उधळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2018 05:16 IST

गुप्तधन काढण्यासाठी १ लाख ६८ हजार घेऊन मुलीचा बळी देण्याचा डाव ‘अंनिस’ व पोलिसांच्या सतर्कतेमुळे उधळून लावण्यात आला.

वडोदबाजार (जि. औरंगाबाद) : गुप्तधन काढण्यासाठी १ लाख ६८ हजार घेऊन मुलीचा बळी देण्याचा डाव ‘अंनिस’ व पोलिसांच्या सतर्कतेमुळे उधळून लावण्यात आला. शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास फुलंब्री तालुक्यातील रांजणगाव शिवारातील शेतवस्तीवर हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना पकडून पुजेचे साहित्य, हंडा व मूर्ती जप्त केली.रांजणगाव येथील दिंगबर कडूबा जाधव यांचे गावात पडके घर असून या घरात दडलेले गुप्तधन काढण्यासाठी बाळू गणपत शिंदे व इमामखा हसन पठाण (रा. दोघे जालना) या स्वयंघोषीत मांत्रिकांनी त्यांच्याकडून १ लाख ६८ हजार रुपये घेतले होते. मागील पंधरा दिवसांपासून गुप्तधन काढण्याचे नियोजन केले जात होते. यासाठी जाधव यांनी त्यांना अगोदरच धान्य, दाळ, दाणे दिले होते. तसेच इतर पुजेचे सामान आणण्यासाठी आणखी पैसेही दिले होते. त्यानुसार जाधव यांच्या शेतात एक खड्डा खोदण्यात आला. त्यामधून दोन दिवसांपूर्वी शिंदे व पठाण यांनी चलाखीने दीड किलो वजनाची सोन्याची भासवून पितळी मूर्ती व एक तांब्याचा हंडा काढून दाखवला होता. त्यामुळे त्यांचा विश्वास बसला. परंतु हंडा कापडाने बांधून तो सोन्याने भरल्याचे सांगून दुसरा हंडा काढेपर्यंत त्याचे तोंड उघडायचे नाही, अशी ताकीद देण्यात आली होती.शुक्रवारी रात्री दुसरा हंडा ते काढून देणार होते. त्यासाठी एका मुलीची नग्न अवस्थेत पूजा करुन तिचा बळी त्याठिकाणी दिला जाणार होता. तशी तयारी करण्यात येत असल्याची माहिती अंनिसचे शहाजी भोसले यांना मिळाली. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता औरंगाबाद येथील शिवसेनेचे विभाग प्रमुख पंडित बोरसे यांना घेऊन फुलंब्री पोलीस ठाणे गाठले व घटनेची माहिती दिल्यांनतर भंडाफोड झाला.रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी वडोदबाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद