औरंगाबाद : शिवसेनेचा गड असलेल्या औरंगाबाद शहरात भाजपने गुरुवारी पूर्णत: धुराळा उडवून टाकला. शहरातील सर्व कार्यक्रम साम, दाम, दंड, भेदाने हायजॅक केले होते. शहरातील प्रत्येक चौक पक्षाने ताब्यात घेत शेकडो वाहनांतून टीव्ही सेंटर येथील सभेला कार्यकर्त्यांची फौज नेण्यात आली. टीव्ही सेंटर येथील सभेतून भाजपने पूर्व, मध्य आणि फुलंब्री विधानसभा मतदारसंघांवर लक्ष केंद्रित केले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक कार्यक्रम जालना लोकसभा मतदारसंघात, तर उर्वरित सर्व कार्यक्रम औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात होते. मुंबईतून निघण्यास मुख्यमंत्र्यांना उशीर झाल्यामुळे सगळे कार्यक्रम लांबले. तरीही त्यांनी एका शाहीभोजनाचा कार्यक्रम टाळत सर्व कार्यक्रमांना हजेरी लावली.एमजीएम येथे झालेल्या भाजयुमोच्या विजय लक्ष्य २०१९ या राज्यस्तरीय कार्यशाळेत एनडीए, भाजपवर जनता पुन्हा जबाबदारी देईल, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला असला तरी स्वबळावर निवडणूक लढविण्यासाठी कार्यशाळेत सहभागी झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांकडून अर्ज भरून घेण्यात आले. त्यामध्ये मतदारसंघासह स्वबळ आजमावण्याबाबत प्रश्न विचारणा करण्यात आल्याची चर्चा होती. सर्व प्रशासकीय विभागनिहाय भाजयुमोच्या सरचिटणीसांनी पदाधिकाºयांशी चर्चा केली. ही चर्चा करताना सरचिटणीसांचे विभाग बदलण्यात आले. त्यामुळे पदाधिकाºयांनी स्पष्टपणे आपले मत सरचिटणीसांना सांगितले.३५ जिल्ह्यांत केला दौराभाजपने ३५ जिल्ह्यांत दौरा केला आहे. त्यातील २३ कामे बुथनिहाय विचारण्यात आली आहेत. नशिबाऐवजी संघटनेवर निवडणूक लढविण्याबाबत भाजपने तयारी सुरू केली आहे. मुख्यमंत्री चषक स्पर्धेत सहभागी झालेल्या ४३ लाख युवक खेळाडूंना भाजपच्या आखाड्यात ओढण्याची व्यूहरचना भाजप आखू लागले आहे. मिल्ट्रीप्रमाणे ही भरती पक्षात आली तरी संकुचित भावनेने कार्यकर्त्यांनी वागू नये, असा सल्ला कार्यशाळेत देण्यात आला.संपर्कमंत्र्यांची गैरहजेरीजिल्ह्याचे संपर्कमंत्री म्हणून काम पाहणाºया ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांची गैरहजेरी चर्चेचा विषय ठरली. शहरातील बहुतांश होर्डिंग्जवर त्यांचे छायाचित्र देखील काही पदाधिकाºयांनी लावले नाहीत. मुंडे या गैरहजर होत्या की, त्यांना टाळले. यावरून उलटसुलट चर्चा होती.
शिवसेनेच्या गडात भाजपचा धुराळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2019 22:57 IST
शिवसेनेचा गड असलेल्या औरंगाबाद शहरात भाजपने गुरुवारी पूर्णत: धुराळा उडवून टाकला. शहरातील सर्व कार्यक्रम साम, दाम, दंड, भेदाने हायजॅक केले होते. शहरातील प्रत्येक चौक पक्षाने ताब्यात घेत शेकडो वाहनांतून टीव्ही सेंटर येथील सभेला कार्यकर्त्यांची फौज नेण्यात आली. टीव्ही सेंटर येथील सभेतून भाजपने पूर्व, मध्य आणि फुलंब्री विधानसभा मतदारसंघांवर लक्ष केंद्रित केले.
शिवसेनेच्या गडात भाजपचा धुराळा
ठळक मुद्देस्वबळावर निवडणूक लढविण्यासाठी मंथन: नशिबाऐवजी संघटनेच्या जोरावर लढणार