शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यातून भाजपचे एकमेव मंत्री, अतुल सावे दुसऱ्यांदा राज्य मंत्रीमंडळात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2022 14:49 IST

अतुल सावे फडणवीस मुख्यमंत्री असताना शेवटच्या टप्प्यात चार महिन्यांसाठी राज्यमंत्री होते.

औरंगाबाद: शिंदे- फडणवीस मंत्रिमंडळाचा आज कॅबिनेट विस्तार पार पडला. आज एकूण १८ मंत्र्यांनी शपथ घेतली. यात मराठवाड्यातून चार आमदारांची वर्णी लागली आहे. विभागात शिंदे गटाचे वर्चस्व दिसत असताना भाजपकडून केवळ अतुल सावे हे एकमेव नाव मंत्रिमंडळात आहे. अतुल सावेऔरंगाबाद पूर्व मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडून आले आहेत. त्यांचा राज्य मंत्रिमंडळ समावेश होताच शहर भाजपने गुलमंडी येथे जल्लोष केला.  

अतुल सावे फडणवीस मुख्यमंत्री असताना शेवटच्या टप्प्यात चार महिन्यांसाठी राज्यमंत्री होते. त्यानंतर आज त्यांना दुसऱ्यांदा मंत्रीमंडळात समावेश झाला असून यावेळी त्यांना कॅबिनेट पदी बढती देण्यात आली आहे. सावे हे औरंगाबाद पूर्व या विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. भाजपने सावे यांना मंत्रीकरून आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने रणनीती आखली आहे. शहरातून भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड आणि रावसाहेब दानवे यांच्यानंतर भाजपने सावे यांच्या माध्यमातून तिसरे मंत्रिपद दिले आहे . तीन मंत्रिपदाच्याद्वारे आगामी काळात भाजप शिवसेनेचा बाल्लेकिल्ला असलेल्या औरंगाबाद आणि राष्ट्रवादीचे प्रस्थ असलेल्या मराठवाड्यात वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी मदत होणार होईल. दरम्यान, शपथविधीनंतर मंत्री सावे यांनी, मराठवाड्याचा मागील अडीज वर्षात थांबलेला विकास पुन्हा सुरु होईल असा विश्वास व्यक्त केला. मागील वेळी चार महिनेच संधी मिळाली होती. आता मोठी संधी असून विकासात्मक कामे करण्यास प्राधान्य देऊ, अस निर्धार सावे यांनी व्यक्त केला. 

सावेंच्या घरी आंदोत्सव, भाजपकडून जल्लोष मंत्रीपदी वर्णी लागल्याने अतुल सावे यांच्या घरी आनंदाचे वातावरण आहे. भाजपने देखील गुलमंडी येथे जल्लोष केला. सावे यांच्या आईने आज सकाळी मुलासोबत बोलणे झाले होते. मंत्रीपद मिळाल्याने आनंद झाला आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. तसेच सावे यांच्या वहिनी आणि पुतणे यांनी शहर आणि मराठवाड्याच्या विकासात मंत्रीपदाने भर पडेल, अशा भावना व्यक्त केल्या. 

टॅग्स :Atul Saveअतुल सावेAurangabadऔरंगाबादBJPभाजपाCabinet expansionमंत्रिमंडळ विस्तार