शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेत शिवसेनेला धोबीपछाड देण्यासाठी भाजपचा 'मास्टर प्लॅन'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2019 12:09 IST

भाजपकडे स्वत:चे २३ सदस्य आहेत. सत्तास्थापनेसाठी ८ सदस्यांची गरज आहे.

ठळक मुद्दे३ जानेवारी रोजी होणार निवडणूकराज्य मंत्रिमंडळ विस्तारानंतर येणार वेग

औरंगाबाद : जिल्हा परिषदेत सर्वात मोठा पक्ष असूनही भाजपला मागील तीन वर्षांपासून सत्तेबाहेर राहावे लागले आहे. याचा वचपा काढण्याची तयारी भाजपच्या वरिष्ठ पातळीवर सुरू आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर पक्षांच्या ८ सदस्यांना आपल्या बाजूला वळविण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. यात काँग्रेसचा एक मोठा गट गळाला लावण्यासाठी बोलणी सुरू आहे. यात यश मिळते का, हे ३ जानेवारी रोजी होणाऱ्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीतच समजणार आहे.

जि.प.च्या पावणेतीन वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत भाजपचे २३ सदस्य निवडून आले होते. दुसऱ्या क्रमांकावर शिवसेना १८, काँग्रेस १६, राष्ट्रवादी काँग्रेस ३, मनसे १ आणि रिपाइं (डी)१ सदस्य आहेत. भाजपला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी शिवसेने काँग्रेसशी हातमिळवणी केली होती. त्यावेळी पहिली अडीच वर्षे अध्यक्षपद शिवसेनेला आणि उर्वरित अडीच वर्षे काँग्रेसला देण्याचा ठराव झाल्याचा दावा काँग्रेसकडून केला जात आहे. त्यावेळी काँग्रेसचे आमदार असलेले अब्दुल सत्तार हे आता शिवसेनेत आहेत. त्यांच्यासोबत काँग्रेसचे ६ सदस्य असल्याचे समोर येत आहे. या सदस्यांमुळे शिवसेनेचे संख्याबळ वाढले आहे. याचवेळी विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील समीकरणे बदलली आहेत. 

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत आली आहे. त्यामुळे काँग्रेसने दिलेला शब्द पाळण्याचे आवाहन शिवसेनेला केले आहे. मात्र, शिवसेना अध्यक्षपदावरील दावा सोडण्याची शक्यता कमी आहे. दोन्ही पक्षांतील बेबनावाचा फायदा उचण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू आहे. भाजपच्या एका जबाबदार सदस्याने सांगितले की, भाजपकडे स्वत:चे २३ सदस्य आहेत. सत्तास्थापनेसाठी ८ सदस्यांची गरज आहे. मनसे, रिपाइं (डेमोक्रॅटिक) प्रत्येकी १ आणि राष्ट्रवादीच्या दोन सदस्यांचे मन वळविण्यात यश आल्याचे सांगितले. तसेच उर्वरित चार सदस्यांसाठी काँग्रेसमधील तिसऱ्या इच्छुक गटातील चार सदस्य फोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जि.प.मध्ये भाजपची सत्ता आणण्याची जिम्मेदारी ही माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, गंगापूरचे आ. प्रशांत बंब आणि प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड यांच्यावर सोपविली आहे. याशिवाय शिवसेनेच्या १७ सदस्यांपैकी असंतुष्ट दोन सदस्यांवरही भाजपची नजर असल्याचे समजते. भाजपच्या या प्रयत्नांना किती यश मिळते, हे ३ जानेवारी रोजीच स्पष्ट होणार आहे.

मतदानातून दाखवून देऊजि.प.च्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीची सत्ता येईल. कोणी इतरही पक्ष प्रयत्न करीत असतील तर त्यांना तो अधिकार आहे. महाविकास आघाडीचा एकही सदस्य फुटणार नाही. शिवसेनेच्या सदस्यांना फोडण्याचा तर प्रयत्नही कोणी करू नये, प्रयत्न केल्यास शिवसेना स्टाईलने उत्तर मिळेल. अध्यक्ष कोणाचा होणार, हे मतदानातून दाखवून देऊ, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आ. अंबादास दानवे यांनी दिली. भाजपचे प्रवक्ते शिरीष बोराळकर म्हणाले, भाजप वेट अ‍ॅण्ड वॉचच्या भूमिकेत आहे. काय होणार, हे आम्ही आताच सांगणार नाहीत. मात्र, नक्कीच काही तरी होणार आहे.

टॅग्स :Aurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषदBJPभाजपाShiv SenaशिवसेनाAurangabadऔरंगाबादElectionनिवडणूक