शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

पूरस्थिती असली तरी पुन्हा भाजपची महाजनादेश यात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 12:37 IST

महापुरातून मराठवाड्यातील दुष्काळी भागाकडे ही यात्रा प्रवास करणार आहे.

ठळक मुद्दे२१ ऑगस्ट रोजी आष्टी मतदारसंघातून यात्रेचा मराठवाड्यात प्रवेश होईल. महाजनादेश यात्रा मराठवाड्यातील ३२ मतदारसंघांतून जाणार आहे.

औरंगाबाद : राज्यातील पूरस्थिती अद्याप सुरळीत झालेली नसताना आणि राज्य सरकारकडून अद्याप ठोस उपाययोजना झालेली नसताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा २१ ऑगस्टपासून पुन्हा सुरु होणार आहे. महापुरातून मराठवाड्यातील दुष्काळी भागाकडे ही यात्रा प्रवास करणार आहे. 

महापूर स्थिती हाताळण्यावरून सरकारविरोधात जनक्षोभ निर्माण झाला. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी ‘सेल्फी स्माईल’ करीत पूरग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळले. अर्धे राज्य पुरात बुडालेले असताना मुख्यमंत्री महाजनादेशात गुंतलेले असल्याची टीका विरोधकांनी सुरू केल्यानंतर मुख्यमंत्र्यांना यात्रा अर्धवट सोडून मुंबई गाठावी लागली. त्यांनी पूरपरिस्थितीतून कोल्हापूर, सांगली, सातारा या तिन्ही जिल्ह्यांना बाहेर काढण्यासाठी यंत्रणेला आदेश दिले. मात्र अद्यापही परिस्थिती गंभीर असताना आणि पुरानंतरच्या मदतीबाबत तसेच आरोग्याच्या प्रश्नाबाबत ठोस उपाययोजना झालेली नसताना महाजनादेश यात्रा पुन्हा सुरू होणार आहे. त्यात काही बदल करण्यात आले आहेत. महाजनादेश यात्रा मराठवाड्यातील ३२ मतदारसंघांतून जाणार आहे. आता ही यात्रा २१ ते ३१ ऑगस्टपर्यंत आहे. विभागात १६ आमदार भाजपचे आहेत, तर शिवसेनेचे १५ आमदार आहेत. ३२ मतदारसंघ यात्रेच्या माध्यमातून ढवळून काढल्यानंतर जो जनादेश भाजपच्या पदरी पडेल त्यावर शिवसेनेसोबत युती करायची, की स्वतंत्र लढायचे, याबाबत पक्षांतर्गत चिंतन होण्याची शक्यता आहे. 

स्वबळाची चाचपणी २१ ऑगस्ट रोजी आष्टी मतदारसंघातून यात्रेचा मराठवाड्यात प्रवेश होईल. तेथून बीड, गेवराई तेथून पुढे अंबड व बदनापूर या भागातून औरंगाबाद पूर्व मतदारसंघात सभा होईल. फुलंब्री, सिल्लोड, भोकरदन, जालना, मंठा, सेलू, पाथरी, मानवत, परभणीत भाजपची हवा करण्यात येईल. नंतर औंढा नागनाथ, हिंगोली, कळमनुरी, अर्धापूर, नांदेड, लोहा, अहमदपूर, उदगीर, लातूर, निलंगा, औसा, उस्मानाबाद व तुळजापूरमार्गे सोलापूर जिल्ह्याकडे ही यात्रा रवाना होईल. १० दिवसांत मुख्यमंत्र्यांच्या काही मतदारसंघांत सभा होणार आहेत. या सभांमधून स्वबळाची चाचपणी करण्यात येईल, असे भाजपच्या गोटातून सांगण्यात आले.

टॅग्स :BJPभाजपाMarathwadaमराठवाडाfloodपूर